Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीच्या भावाला मिळाला ' हा ' पुरस्कार

पण विराटचा भाऊ विकासला आता एक पुरस्कार मिळाला आहे. विराट आणि अनुष्का यांनी ट्विटरवरून विकासला शुभेच्छाही दिल्या आहेत. पण विकासला असा कोणता पुरस्कार मिळाला, हे तुम्हाला माहिती नसेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 20:27 IST

Open in App
ठळक मुद्देविकासला हा पुरस्कार मिळाल्यामुळे कोहली भलताच खूष झाला आणि त्याने आपल्या भावाचे अभिनंदनही केले आहे. 

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली हा धावांचे डोंगर उभारत असतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने बरेच सामने जिंकलेही आहेत. त्याला पुरस्कार मिळणे ही ही काही नवीन बाब नाही. आतापर्यंत बरेच पुरस्कार त्याने पटकावलेले आहेत. त्यामुळे त्याला पुरस्कारांचे नवल नाही. पण विराटचा भाऊ विकासला आता एक पुरस्कार मिळाला आहे. विराट आणि अनुष्का यांनी ट्विटरवरून विकासला शुभेच्छाही दिल्या आहेत. पण विकासला असा कोणता पुरस्कार मिळाला, हे तुम्हाला माहिती नसेल.

एका वृत्तसमूहाने खाद्यपदार्थांची एक स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत सर्वोत्तम वेस्टर्न खाद्यपदार्थ, असाही एक विभाग होता. या विभागात विकासला पारितोषिक मिळाले आहे. विकासला हा पुरस्कार मिळाल्यामुळे कोहली भलताच खूष झाला आणि त्याने आपल्या भावाचे अभिनंदनही केले आहे. 

ट्विटरवर विकासला शुभेच्छा देताना विराट म्हणाला की, " माझा भाऊ हा एका नामवंत स्पर्धेत विजेता ठरला आहे. माझ्या भावाचे रेस्टॉरंट तसे नवीनच आहे. पण या कमी कालावधीमध्ये त्याने हा पुरस्कार पटकावणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. या पुरस्कारामुळे ही गोष्ट सिद्ध होते की, तो किती चांगले खाद्यपदार्थ बनवत असेल. "

टॅग्स :विराट कोहली