Join us  

Virat Kohli, IPL 2022 : विराट कोहलीला बसला 394 कोटींचा फटका; तरीही Ranveer Singh वर पडला भारी

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा सध्या फॉर्माशी झगडत असला तरी आजही तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 3:50 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा सध्या फॉर्माशी झगडत असला तरी आजही तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो विराट कोहलीचे आकडे सर्वांना अजंबित करणारे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतकं त्याच्या नावावर आहेत आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. त्यामुळेच जगातील अनेक ब्रँड्सनी त्याला करारबद्ध केले आहे. पण, 2021च्या आकडेवारीत विराटची brand values 55 मिलियन डॉलरने म्हणजेच 394 कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

विराट कोहलीकडे भारताच्या तीनही फॉरमॅटच्या संघाचे नेतृत्व राहिलेले नाही. दुबईत झालेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी त्याने ट्वेंटी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याच्याकडून वन डे संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातही तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) कर्णधार म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून खेळतोय आणि त्याचा फटका त्याच्या brand values वर पडल्याची चर्चा सुरू आहे.

2020 मध्ये विराटची brand values 238 मिलियन डॉलर इतकी होती आणि 2021मध्ये ती 186 मिलियन डॉलर अर्थात  1412 कोटी 66 लाख 53,500 इतकी झाली आहे. पण, सलग पाचव्या वर्षी तो भारतीय सेलिब्रेटिंगमध्ये सर्वाधिक  brand values असलेला खेळाडू आहे. बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग ( Ranveer Singh) हा 158.3 मिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानी आहे. महेंद्रसिंग धोनीची brand values वाढून 61 मिलियन डॉलरवर गेली आहे आणि तो अक्षय कुमार ( 139 मिलियन डॉलर) व आलिया भट ( 68 मिलियन डॉलर) यांच्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे.  

टॅग्स :विराट कोहलीरणवीर सिंगमहेंद्रसिंग धोनी
Open in App