Join us

T20 World Cup: विराट-अनुष्काच्या १० महिन्यांच्या वामिकावर अत्याचाराची धमकी

एका व्यक्तीने केलेले हे ट्वीट सध्या व्हायरल झाले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही मोहम्मद शमीवर अनेकांनी अत्यंत हीन दर्जाची टीका केली होती. यावेळी तर विराटच्या कुटुंबीयांवर टीका करताना लोकांनी नीचपणाचा कळसच गाठला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 05:30 IST

Open in App

दुबई : टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर सध्या सडकून टीका होते आहे. ही टीका करताना काही विकृत चाहत्यांनी पातळी सोडून बोलायला सुुरुवात केली आहे. अशाच काही उपद्रवी लोकांनी आता विराट कोहलीसोबतच त्याच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केले आहे. समाजमाध्यमांवर विराट आणि अनुष्काच्या १० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकीच दिली जात आहे.

एका व्यक्तीने केलेले हे ट्वीट सध्या व्हायरल झाले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही मोहम्मद शमीवर अनेकांनी अत्यंत हीन दर्जाची टीका केली होती. यावेळी तर विराटच्या कुटुंबीयांवर टीका करताना लोकांनी नीचपणाचा कळसच गाठला आहे. याआधीही भारतीय संघ पराभूत झाला की, अनुष्का शर्माला ट्रोल केले जायचे. यावेळी तर विराट आणि अनुष्काच्या १० महिन्यांच्या वामिकाला लक्ष्य करण्यात आले आहे. भारतीय चाहत्यांमध्ये असलेला खिलाडूवृत्तीचा अभाव यानिमित्ताने जगासमोर प्रदर्शित झाला आहे.

कोहली कुटुंबीयांवर करण्यात आलेल्या या टीकेचा पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमान उल् हकने खरपूस समाचार घेतला आहे. “विराटच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेली टीका ऐकून खूप वेदना झाली. कोहलीच्या नेतृत्वावर आणि फलंदाजीवर तुम्ही टीका करू शकता. पण त्याच्या कुटुंबीयांवर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असे इंझमाम म्हणाला. 

टॅग्स :विराट कोहलीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App