Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीवर क्रिकेटविश्वातील दिग्गजांसह जगभरातील करोडो चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षांव

भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने रविवारी आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. या वेळी त्याच्यावर क्रिकेटविश्वातील दिग्गजांसह जगभरातील करोडो चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:00 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने रविवारी आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. या वेळी त्याच्यावर क्रिकेटविश्वातील दिग्गजांसह जगभरातील करोडो चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.राजकोट येथे शनिवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला. मात्र, भारतीय संघातील खेळाडूंनी या पराभवाचे नैराश्य न घेता आपल्या कर्णधाराचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. एकीकडे संघासह कोहली वाढदिवस साजरा करत असताना सोशल नेटवर्किंगवर जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोहलीला टिष्ट्वटरद्वारे शुभेच्छा देताना म्हटले, ‘‘एक युवा, उत्साही क्रिकेटर आज जग जिंकणाºया संघाचे नेतृत्व करीत आहे. खूप मोठा पल्ला पार करून तू येथे पोहोचला आहेस, भविष्यात तुला आणखी यश मिळो. तुला खूप शुभेच्छा.’’ भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कोहलीला शुभेच्छा देताना टिष्ट्वट केले, ‘आतापर्यंत आणखी एक शानदार वर्ष ठरले. शुभेच्छा.’ माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने टिष्ट्वट केले, ‘तू भविष्यात जे काही काम करशील त्यासाठी खूप शुभेच्छा विराट कोहली. तुझे समर्पण आणि तुझा उत्साह आम्हाला यापुढेही प्रेरित करेल, अशी अपेक्षा आहे.’‘धोनीबरोबरच्या नात्यावर कशाचाही परिणाम नाही’विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यातील ‘केमिस्ट्री’ दिवसेंदिवस जास्तच मजबूत होत चालली आहे. विराट कोहलीला या गोष्टीचा अभिमानही वाटतो. त्याच्या मते, कोणत्याही बाह्य गोष्टीमुळे आमच्या मैत्रीवर परिणाम होणार नाही. कोहलीने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे, ‘आमच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या अनेक जण देत असतात. मात्र, आम्ही दोघेही अशा बातम्या वाचतही नाही.केक फासूनहार्दिकने घेतला बदलाराजकोट : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा आज ५ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. दुसºया टी-२0 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे विराट कोहलीच्या २९ व्या वाढदिवसाच्या आनंदावर नक्कीच विरजण पडलंय. पण पराभव विसरून ४ नोव्हेंबरला टीम न्यूझीलंडविरुद्धचा सामना झाल्यावर रात्री १२ वाजता टीमने ड्रेसिंग रूममध्ये केक कापून विराटचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडूनही विशेष आयोजन करण्यात आले होते.विराटने केक कापून झाल्यानंतर हार्दिकने त्याचा बदला घेतला. त्याने विराटच्या चेहºयाला केक लावून अक्षरश: त्याला भूत बनवलं. १७ आॅक्टोबरला पांड्याचा वाढदिवस होता. तेव्हा पांड्याच्या चेहºयावर पूर्णपणे केक लावण्यात आला होता. त्या वेळी, वर्षात प्रत्येकाचा वाढदिवस येतो... बदला घेतला जाईल, असं पांड्या म्हणाला होता.विराटला केक लावून झाल्यानंतरत्याने कोहलीसोबतचा फोटो टिष्ट्वट केला आणि बदला नंबर १... वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन कोहली असं टिष्ट्वट केलं.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघक्रिकेटक्रीडा