Join us

विराट कोहलीचा झाला विस्डेनकडून गौरव

विस्डेनने लिहिले, ‘कोहली गुणवत्तेचा धनी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 03:04 IST

Open in App

लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहली याचा दशकातील पाच सर्वोत्कृष्ट विस्डेन क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. कोहलीशिवाय द. आफ्रिकेचा डेल स्टेन आणि एबी डिव्हिलियर्स,आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ तसेच महिला क्रिकेटपटू एलिस पेरी यांचा यादीत समावेश आहे.

कोहलीने गेल्या १० वर्षांत अन्य कुठल्याही फलंदाजाच्या तुलनेत ५,७७५ पेक्षा अधिक धावा काढल्या असून, दशकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. ३१ वर्षांच्या कोहलीला विस्डेन कसोटी संघाचा कर्णधारदेखील नेमण्यात आले आहे. याशिवाय कोहलीचा एकदिवसीय संघातही समावेश करण्यात आला.

विस्डेनने लिहिले, ‘कोहली गुणवत्तेचा धनी आहे. इंग्लंडच्या २०१४ च्या दौऱ्यापासून बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबरमध्ये झालेल्या कोलकाता येथील दिवस-रात्र कसोटीपर्यंत त्याने ६३ च्या सरासरीने २१ शतके आणि १३ अर्धशतके ठोकली. तिन्ही प्रकारात किमान ५० च्या सरासरीने धावा काढणारा कोहली एकमेव फलंदाज ठरला. अलीकडे स्टीव्ह स्मिथ यानेही कोहलीसारखा कुणी नसल्याची कबुली दिली होती. सचिनची निवृत्ती आणि धोनीच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वळणार कोहलीसारखा दडपणात खेळणारा खेळाडू दुसरा कुणी नाही. कोहलीने मागील एक दशकात कसोटीत २७ शतकांसह कसोटीत ७,२०२, एकदिवसीय सामन्यांत ११,१२५, आणि टी२० त २,६३३ धावा केल्या. आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये त्याची ७० शतकेआहेत.  

टॅग्स :विराट कोहलीलंडन