Join us

अखेरच्या निर्णायक षटकात विराट कोहली झाला होता हतबल; पाहा व्हिडीओ...

अखेरच्या निर्णायक षटकात एक कर्णधार म्हणून विराट कोहलीने आपले डोके शांत ठेवायला हवे होते. पण या निर्णायक षटकामध्ये तो संघातील सर्वात जास्त निराश खेळाडू दिसत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 15:32 IST

Open in App
ठळक मुद्देकोहली हा एक फलंदाज म्हणून यशस्वी असला तरी त्याला संघाचे नेतृत्व करणे जमत नसल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामना चांगलाच रंगतदार झाला. या सामन्याच्या अखेरच्या निर्णायक षटकात एक कर्णधार म्हणून विराट कोहलीने आपले डोके शांत ठेवायला हवे होते. पण या निर्णायक षटकामध्ये तो संघातील सर्वात जास्त निराश खेळाडू दिसत होता. काही वेळेला तर त्याने शिव्याही हासडल्या. काही वेळा त्याचा स्वत:वर कंट्रोलही नव्हता. 

भाराताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हे अखेरचे षटक टाकत होता. कोहलीने उमेशची लयही यावेळी बिघडल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर कोहलीने क्षेत्ररक्षण लावतानाही काही चुका केल्या. कोहली हा एक फलंदाज म्हणून यशस्वी असला तरी त्याला संघाचे नेतृत्व करणे जमत नसल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

पाहा हे अखेरच्या षटकाचे व्हिडीओ

 

 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज