Join us

Virat Kohli: विराट कोहलीला विकाव्या लागल्या स्वत:कडील कोट्यवधीच्या कार, समोर आलं धक्कादायक कारण  

Virat Kohli: विराट कोहलीने आपल्याकडील बहुतांश महागड्या कार विकल्या आहेत. या कार विकण्यामागचं नेमकं कारण विराट कोहलींने स्वत:च सांगितलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 18:08 IST

Open in App

भारताचा स्टाऱ फलंदाज विराट कोहलीने गेल्या काही दिवसांमध्ये आपला फॉर्म पुन्हा एकदा परत मिळवला आहे. आता विराट यंदाच्या आयपीएलच्या हंगामाची जोरदार तयारी करत आहे. दरम्यान, विराट कोहलीबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. विराट कोहलीने आपल्याकडील बहुतांश महागड्या कार विकल्या आहेत. विराट कोहलीला महागड्या कार आणि दुचाकींचा खूप शौक आहे. त्यानंतरही त्याने त्याच्याकडील अनेक कार विक्रीस काढल्या आहेत. या कार विकण्यामागचं नेमकं कारण विराट कोहलींने स्वत:च सांगितलं आहे. 

विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीम फोटो शूटआऊटदरम्यान, आरसीबी बोल्ड डायरीजमध्ये सांगितले की, मी ज्या कारचा मालक होतो, त्यामधील बहुतांश कार खरेदी करण्याचा निर्णय हा अव्यवहार्य होता. मी क्वचितच त्या कारमधून ड्रायव्हिंग आणि प्रवास करण्याचा आनंद घेतला असेल. एका काळानंतर हे सर्व व्यर्थ आहे. त्यामुळे मी त्यामधील बहुतांश कार विकरण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही केवळ त्याच कार वापरतो, ज्यांची आम्हाला खरीच गरज आहे. विराट कोहलीने पुढे सांगितले की, मला वाटते की, हा परिपक्व होण्याचा आणि काही गोष्टींबाबत अधिक जागरुक होण्याचा भाग आहे. आता तुमचं मन खेळणी बाळगण्यात रमत नाही. हे व्यावहारिक होण्याबाबत आहे.

दरम्यान, विराट कोहलीने आयपीएलमधील २२३ सामन्यामध्ये आतापर्यंत ६६२४ धावा जमवल्या आहेत. एका आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली अव्वलस्थानी आहे. २०१६ च्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने अनेक रेकॉर्ड्स बनवले होते. त्या हंगामात विराट कोहलीने चार शतके ठोकली होती. तसेच एकूण ९७३ धावा जमवल्या होत्या. या विक्रमाची अद्याप कुणालाही बरोबरी करता आलेली नाही. 

टॅग्स :विराट कोहलीकारआयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App