Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीने शर्ट काढलं, पण नेटिझन्सने पँटच उतरवली...

तुझी पण वाहतुक पोलिसांनी पावती फाडली का, असं म्हणत काही जणांनी कोहलीची हुर्यो उडवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:56 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपला एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर लोकांनी कोहलीला चांगलेच ट्रोल केले आहे. तुझी पण वाहतुक पोलिसांनी पावती फाडली का, असं म्हणत काही जणांनी कोहलीची हुर्यो उडवली आहे.

सध्याच्या घडीला भारतामध्ये वाहतुक पोलीसांनी लावलेल्या दंडांची रक्कम चांगलीच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला चक्क 23 हजार रुपयांचा दंड लावला होता. त्यानंतर या गोष्टीवर बरेच जोक्स आणि मिम्स आहे. आता चाहते तर कोहलीलाही या गोष्टीवरूनच ट्रोल करताना दिसत आहेत.

 

हरियाणात गुरुग्राममधील एका स्कूटी चालकाला मोटार वाहन कायद्यातील नव्या नियमांनुसार २३ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना चर्चेत होती. स्कूटीचे आरसी, चालक परवाना, पीयूसी, विमा आदींपैकी एकही कागदपत्र नसल्यानं दिनेश मदान यांच्या नावे वाहतूक पोलिसांनी ही पावती फाडली होती. स्कूटीची किंमत १५ हजार रुपये आणि दंड २३ हजार रुपयांचा, या अजब गणितामुळे ही पावती गाजली. आता कोहलीला या पावतीवरूनच ट्रोल केले जात आहे.

टॅग्स :विराट कोहली