Join us  

विराट कोहली २०२७ला वर्ल्ड कप जिंकणार; ज्योतिषाची भविष्यवाणी, २०१६ साली जे म्हणाले ते ठरतंय खरं   

वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने वर्ल्ड रेकॉर्ड ७६५ धावा चोपल्या. एवढी चांगली कामगिरी करूनही विराटला वर्ल्ड कप जिंकता न आल्याची खंत चाहत्यांना सतावतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 2:21 PM

Open in App

वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील पराभवाच्या धक्क्यातून भारतीय चाहते अद्याप सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाची या संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी दणदणीत झाली होती, परंतु अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळ वरचढ ठरला. ऑस्ट्रेलियाने २४१ धावांचे लक्ष्य ६ विकेट्स राखून सहज पार केले. या स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने वर्ल्ड रेकॉर्ड ७६५ धावा चोपल्या. वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीतील या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. एवढी चांगली कामगिरी करूनही विराटला वर्ल्ड कप जिंकता न आल्याची खंत चाहत्यांना सतावतेय. १४० कोटी भारतीयांचे स्वप्न यंदा धुळीस मिळाले असले तरी २०२७ला ते पूर्ण होणार आहे. विराट वर्ल्ड कप उचणार असल्याची भविष्यवाणी २०१६मध्येच झाली होती आणि त्यामुळे चाहत्यांना आशेचा किरण दिसू लागला आहे.

विराट कोहली आता ३५ वर्षांचा आहे आणि तो पुढील वर्ल्ड कप खेळेल की नाही, हेही अद्याप स्पष्ट नाही. पण, विराटची फिटनेस पाहता तो २०२७मध्ये वर्ल्ड कप खेळेल आणि जिंकेलही असी भविष्यवाणी झाली आहे. भारताच्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर फेसबूकची २०१६सालची एक पोस्ट व्हायरल होत आहे.  

 

विराट कोहलीच्या कुंडलीचे विश्लेषण:

  • विराट २०१६ आणि २०१७ मध्ये मोठे स्टारडम मिळवणार. त्याचे क्रिकेट कौशल्य सर्वांना प्रभावित करत राहणार.  शनी जानेवारी २०१७ मध्ये वृश्चिक राशीतून बाहेर पडत असल्याने २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये त्याचे यश आणखी मोठे होईल.
  • विराटच्या लग्नाच्या चर्चा मार्च/एप्रिल २०१७ मध्ये सुरू होईल आणि २०१७ च्या अखेरीस आणि २०१८च्या सुरुवातीला तो लग्नगाठ बांधेल. मी क्रिस्टल बॉलकडे पाहिले तर डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ मध्ये लग्नासाठी खूप अनुकूल आहेत.
  • लग्नानंतर त्याला इंडोअर्समेंटमधून उत्पन्न मिळेल आणि त्याला फेब्रुवारी २०१८ ते सप्टेंबर २०२० दरम्यान अपत्यप्राप्ती होईल. सप्टेंबर २०२० ते २०२१ दरम्यान विराटची कामगिरी फार उत्तम होणार नाही.  
  • विराट सप्टेबर २०२१-२०२५ दरम्यान व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठ्या यशासह जोरदार पुनरागमन करेल. या व्यतिरिक्त, विराटला २०२१-२०२४ दरम्यान आणखी एका बाळ होण्याची संधी असेल.
  • विराटची कारकीर्द ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत अर्धवट गडगडेल. विराटच्या कारकिर्दीला २०२७ मध्ये पुन्हा उभारी येईल आणि तो मार्च २०२८ पूर्वी खूप मोठ्या यशासह तो निवृत्त होईल. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीफलज्योतिष