Virat Kohli, Ranji Trophy नवी दिल्ली: बीसीसीआयने सर्व करारबद्ध क्रिकेटपटूंना देशांतर्गत सामने खेळणे बंधनकारक केले आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा लागणार आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा या सर्व खेळाडूंनी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले; मात्र विराट कोहलीबाबत संभ्रम होता. पण, आता तोदेखील रणजी ट्रॉफीमध्ये १३ वर्षांनंतर पुनरागमन करणार असल्याचे समजते. त्याचा दिल्ली संघात समावेश करण्यात आला आहे.
दिल्लीने २२ जणांचा संघ घोषित केला असून, यात विराटसह ऋषभ पंतचाही समावेश आहे. संघाचे कर्णधारपद आयुष बडोनीकडे आहे. ऋषभ आणि विराट आयुषच्या नेतृत्वात खेळतील. दिल्लीला २३ जानेवारीपासून सौराष्ट्र संघाविरुद्ध खेळायचे आहे. ३० जानेवारीपासून रेल्वेविरुद्ध सामना खेळायचा आहे.