Join us

विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध एकही कसोटी सामना नाही खेळला, कारण...

इथं आपण किंग कोहलीनं कोणत्या संघाविरुद्ध किती धावा केल्या या खास रेकॉर्डसह पाकिस्तान विरुद्ध तो एकही कसोटी सामना न खेळण्यामागचं कारण जाणून घेणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 21:23 IST

Open in App

'रनमशिन' विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कसोटी कारकिर्दीतील १२३ सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापित करणारा किंग कोहली कसोटीत ७ वेगवेगळ्या देशांच्या संघाविरुद्ध मैदानात उतरला आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध एकही कसोटी सामना खेळलेला नाही. इथं आपण किंग कोहलीनं कोणत्या संघाविरुद्ध किती धावा केल्या या खास रेकॉर्डसह पाकिस्तान विरुद्ध तो एकही कसोटी सामना न खेळण्यामागचं कारण जाणून घेणार आहोत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 कोहली पाक विरुद्ध एकही कसोटी सामना नाही खेळला; कारण...

२००८ मध्ये वनडेत पदार्पण केल्यावर जवळपास ३ वर्षांनी २०११ मध्ये विराट कोहलीला कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. २० जून २०११ रोजी त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध  सबिना पार्कच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळला. कोहलीच्या पदार्पणानंतर ते अगदी आता तो निवृत्त होईपर्यंत भारत-पाक यांच्यात एकही कसोटी मालिका खेळवली गेलेली नाही. त्यामुळेच विराट कोहली पाक विरुद्ध एकही कसोटी सामना खेळलेला नाही. भारत-पाक यांच्यातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघातील द्विपक्षीय क्रिकेट मालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून ब्रेक लागला आहे. २०१२-१३ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात वनडे आणि टी-२० सामन्यांची शेवटची मालिका खेळवण्यात आली होती. 

"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !

भारत-पाक संघ फक्त आयसीसी अन् आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसले

द्विपक्षीय क्रिकेट संबंधाला ब्रेक लागल्यापासून भारत-पाक हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत तटस्थ ठिकाणी एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळाले आहे. मर्यादित सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम एकदम जबरदस्त आहे. पाकिस्तान विरुद्ध मर्यादीत षटकांच्या सामन्यात कोहलीनं १५ सामन्यात ३ शतकांसह ६ अर्धशतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.

कसोटीत कोणत्या संघासमोर कसा राहिलाय कोहलीचा रेकॉर्ड

  • ऑस्ट्रेलिया - ३० सामन्यातील ५३ डावात ९ शतके आणि ५ अर्धशतकांसह २२३२ धावा
  • बांगलादेश- ८ सामन्यातील १३ डावात २ शतकांसह ५३६ धावा
  • इंग्लंड- २८ सामन्यातील ५० डावात  ५ शतके आणि ९ अर्धशतकांसह १९९१ धावा
  • न्यूझीलंड १४ सामन्यातील २७ डावात ३ शतके आणि ४ अर्धशतकांसह ९५९ धावा
  • दक्षिण आफ्रिका- १६ सामन्यातील २८ डावात ३ शतके आणि ५ अर्धशतकांसह १४०८ धावा
  • श्रीलंका- ११ सामन्यातील ११ डावात ५ शतके आणि २ अर्धशतकांसह १०८५ धावा
  • वेस्ट इंडिज- १६ सामन्यातील २१ डावात ३ शतके आणि ६ अर्धशतकांसह १०१९ धावा 
टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तान