Join us

IND vs AUS : विराटने जाणून घेतला 'गिली' पॉइंट; ऑस्ट्रेलियात झाली ग्रेट भेट

भारतीय संघ पहिल्यांदा वातावरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी भारतीय संघाला एक सरप्राईज मिळाले ते अॅडम गिलख्रिस्टच्या रुपात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 15:36 IST

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक दौऱ्यात स्लेजिंग पाहायला मिळते. पण ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूंपेक्षा गिलख्रिट हा वेगळा ठरतो. गिलख्रिस्टने कधीही कोणत्या खेळाडूबरोबर स्लेजिंग केली नाही. बाद झाल्यावर पंचांनी निर्णय देण्यापूर्वीच तो मैदान सोडायचा.

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यावर भारतीय संघाने गाबाच्या मैदानात कसून सराव केला. भारतीय संघ पहिल्यांदा वातावरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी भारतीय संघाला एक सरप्राईज मिळाले ते अॅडम गिलख्रिस्टच्या रुपात. 

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आक्रमक असल्याचे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक दौऱ्यात स्लेजिंग पाहायला मिळते. पण ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूंपेक्षा गिलख्रिट हा वेगळा ठरतो. कारण गिलख्रिस्टने कधीही कोणत्या खेळाडूबरोबर स्लेजिंग केली नाही. बाद झाल्यावर पंचांनी निर्णय देण्यापूर्वीच तो मैदान सोडायचा. त्यामुळे सभ्य गृहस्थांचा हा खेळ त्याने जपला होता.

सराव करत असताना गिलख्रिस्टचे मैदानात आगमन झाले. यावेळी त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीशी काही काळ संवाद साधला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली