Virat Kohli Cricket: कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो तब्बल १६ वर्षांनंतर एका मोठ्या स्थानिक स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान कोहलीने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) चे अध्यक्ष रोहन जेटली यांना एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी लिस्ट ए स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केली आहे. तो विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) खेळणार आहे.
विराट कोहलीचा मोठा निर्णय
२४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहली दिल्लीची जर्सी घालून मैदानात उतरण्यास तयार झाला आहे. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी पीटीआयला सांगितले, "विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी त्याची उपलब्धता निश्चित केली आहे. तो किती सामने खेळेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण संघातील त्याची उपस्थिती ड्रेसिंग रूमचे वातावरण ताजेतवाने ठेवेल." भारतीय सुपरस्टार विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी त्याची उपलब्धता निश्चित केली आहे. कोहलीने विजय हजारे ट्रॉफीमधील शेवटचा सामना फेब्रुवारी २०१० मध्ये सर्व्हिसेसविरुद्ध खेळला होता. म्हणजेच तो जवळजवळ १६ वर्षांनी लिस्ट ए डोमेस्टिक क्रिकेटमध्ये परतत आहे.
हा निर्णय का घेतला?
३७ वर्षांचा विराट कोहली २०२४ चा विश्वचषक जिंकल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. सध्या तो फक्त एकदिवसीय स्वरूपात भारतीय संघाचा भाग आहे. त्यामुळे, त्याने आपला फॉर्म आणि फिटनेस राखण्यासाठी हा निर्णय घेतला. बीसीसीआयला टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनीही देशांतर्गत क्रिकेट खेळावे, अशी इच्छा आहे. यादरम्यान, रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या स्फोटक नाबाद १३५ धावांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की तो अजूनही दमदार फॉर्ममध्ये आहे.