आयपीएल २०२६ च्या हंगामाला २८ मार्चपासूपासून सुरुवात होणार आहे. गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सज्ज झाला आहे. किंग कोहली सध्या लंडनमध्ये असून त्याने तिथेच सरावाला सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सरावाची खास झलक शेअर केली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परफेक्ट प्रॅक्सिटस, IPL साठी विराटनं सुरु केला सराव; भारतात कधी परतणार?
विराट कोहलीने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात तो नेट्स प्रॅक्टिस दरम्यान ड्राइव, पुल, कट यासह वेगवेगळ्या शॉट्समधील आपले परफेक्शन दाखवून देताना दिसत आहे. IPL चे वेळापत्रक समोर आल्यावर आता किंग कोहली भारतात कधी परतणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तो १५ मार्चला बंगळुरुमध्ये आरसीबीच्या ताफ्यात सामील होईल, अशी माहितीही समोर येत आहे. यासंदर्भात फ्रँचायझीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
IPL 2026: ज्याच्यासाठी मोजले १८ कोटी, तोच होणार स्पर्धेबाहेर? फिटनेस अपडेटने वाढवलं टेन्शन
IPL च्या हंगामाआधी RCB ला मोठा दिलासा
आयपीएलच्या गत हंगामात RCB च्या संघाने पहिली वहिली ट्रॉफी जिंकली होती. जेतेपदाचा जल्लोष साजरा करताना बंगळुरुच्या स्टेडियमवर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्यामुळे बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी घालण्यात आली होती. पण यंदाच्या हंगामाआधी घरच्या मैदानात सामने खेळण्याचा RCB चा मार्ग मोकळा झाला आहे. घरच्या मैदानातील ५ सामने आरसीबी बंगळुरुच्या मैदानात खेळणार आहे.
पुन्हा पाहायला मिळेल विराट क्रेझ
विराट कोहलीने आंतरारष्ट्रीय टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो फक्त वनडेत सक्रीय आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेत १८ जानेवारीला विराट कोहली अखेरचा सामना खेळला होता. आता पुन्हा तो IPL च्या माध्यमातून मैदानात उतरणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा विराट क्रेझ पुन्हा पाहायला मिळेल.
Web Summary : Virat Kohli is preparing for IPL 2026 in London, sharing practice glimpses online. He's expected to join RCB in Bangalore around March 15th. RCB will play 5 home games after a ban was lifted. Kohli will return to the field, exciting fans.
Web Summary : विराट कोहली लंदन में आईपीएल 2026 की तैयारी कर रहे हैं, अभ्यास की झलकियाँ ऑनलाइन साझा कर रहे हैं। वह 15 मार्च के आसपास बैंगलोर में आरसीबी में शामिल होने की उम्मीद है। प्रतिबंध हटाए जाने के बाद आरसीबी 5 घरेलू मैच खेलेगा। कोहली मैदान पर लौटेंगे, प्रशंसकों को उत्साहित करेंगे।