Join us

किंग कोहलीची ५ सेकंदाची झलक ठरतीये चर्चेचा विषय, इथं पाहा VIDEO 

जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात तो एकटाच भटकंतीसाठी बाहेर पडल्याचे दिसते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 18:15 IST

Open in App

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो लंडनमधील रस्त्यावर उभा राहिल्याचे दिसून येते. श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेनंतर भारतीय संघातील खेळाडू मोठ्या सुट्टीवर आहेत. या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी विराट कोहली  आपल्या फॅमिलीसोबत इंग्लंडमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहे. पण जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात तो एकटाच भटकंतीसाठी बाहेर पडल्याचे दिसते. 

सोशल मीडियावर किंग कोहलीची दिसलेली अवघ्या  ५ सेकंदाची झलक चर्चेचा वषय ठरते. या व्हिडिओमध्ये तो रस्त्याच्या कडेला उभा असलेले दिसते. रस्ता ओलांडून तो पुढे जाण्याची प्रतिक्षेत दिसतो. विराट कोहली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लंडन शहरात भटकंतीला पसंती करताना दिसून येते.  ही जोडी आता आपल्या मुलांसोबत लंडन शहरात वेळ घालवत आहे.पण जो व्हिडिओ समोर आलाय त्यात फक्त विराट कोहलीची झलक पाहायला मिळते. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली मैदानात उतरला होता. पण ३ सामन्यांच्या मालिकेत त्याला नावाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. जवळपास ८ महिन्यानंतर वनडे खेळताना तीन सामन्यात त्याने फक्त ५८ धावा केल्या होत्या. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी तो देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगली होती. पण दुलिप ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यापेक्षा त्याने विश्रांतीलाच पसंती दिली आहे.

मोकळा वेळ मिळाला की, लंडनमध्ये उड्डाणासाठी सज्ज असणारी जोडी तिकडेच बस्तान बसवण्याच्या विचारात आहे, अशी चर्चाही रंगली होती. विरुष्काने अधिकृतरित्या अशी कोणतीही गोष्ट शेअर केलेली नाही. सातत्याने ही जोडी लंडनमध्ये स्पॉट होत असल्यामुळेच ही गोष्ट अधिक चर्चेत आली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही जोडी इंग्लंडलाच स्थलांतरित होईल, असा या चर्चेचा सूर होता.  

टॅग्स :ऑफ द फिल्डविराट कोहली