Join us  

इंग्लंडकडून पराभव अन् आता विराट कोहलीला आणखी एक धक्का

इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 10, 2021 2:25 PM

Open in App

इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यातच आता कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत (  ICC Test Rankings) विराटची आता पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. चेन्नई कसोटीतील द्विशतकवीर जो रूट ( Joe Root) तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. रूटनं ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला मागे टाकले. IPL 2021च्या लिलावात एन्ट्री, पण खराब कामगिरीमुळे अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या संघात निवड नाही

इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं पहिल्या कसोटीत २१८ धावांची मॅच विनिंग खेळी केली. यामुळे त्यानं क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा केली आहे. रूट ८८३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर सरकला आहे. केन विलियम्सन ( ९१९) व स्टीव्ह स्मिथ ( ८९१) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लाबुशेन ८७८ गुणांसह चौथ्या, तर पाचव्या स्थानावर असलेल्या विराटच्या खात्यात ८५२ गुण आहेत. अजिंक्य रहाणे टॉप टेनमधून बाहेर गेला आहे, चेतेश्वर पुजाराचीही एक स्थान घसरण झाली असून तो ७५४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतनं ( Rishabh Pant ) पहिल्या कसोटीत ९१ धावांची खेळी केली आणि त्याचा फायदा त्याच्या क्रमवारीत झाला. तो ७०० गुणांसह १३व्या क्रमांकावर आहे, परंतु यष्टिरक्षक-फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे. शुबमन ( Shubman Gill) सात स्थानांच्या सुधारणेसह ४०व्या क्रमांकावर आला आहे. वॉशिंग्टन सुंदरही दोन स्थान वर सरकून ८१व्या क्रमांकावर आला आहे.    गोलंदाजांमध्ये आर अश्विन व जसप्रीत बुमराह या भारतीय खेळाडूंनी एक स्थानाची सुधारणा केली आहे. अश्विन ७७१ गुणांसह सातव्या, तर बुमराह ७६९ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. 

टॅग्स :विराट कोहलीआयसीसीजो रूटभारत विरुद्ध इंग्लंड