Join us  

'तो' डाग पुसण्यासाठी विराट कोहलीचा नवा मंत्र; 'कौंटीच्या कौंटी उड्डाणे झेपावे इंग्लंडकडे' 

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीला इंग्लंडमध्ये फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी हा सल्ला दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 12:10 PM

Open in App

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची इंग्लंडमधील कामगिरी त्याच्या कर्तृत्वाला साजेशी नाही. प्रत्येक देशात खोऱ्यानं धावा काढणाऱ्या विराटची बॅट  इंग्लंडमध्ये मात्र शांत असते.  इंग्लंडमध्ये विराट कोहलीला 10 डावांत फलंदाजी करताना फक्त 13.40 च्या सरासरीनं 134 धावांच करता आल्या आहेत. यादरम्यान 39 ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. विराटची कसोटीतील सरासरी 50 च्या पुढे असताना इंग्लंडमधील फलंदाजी सरासरी 13.40 आहे. या आपल्या कामगीरीचे मंथन करण्यासाठी आणि आपल्या कामगीरीत सुधरणा करण्यासाठी विराट कोहलीनं इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.  

इंग्लंडमधील उसळ्या घेणाऱ्या खेळपट्यावर फलंदाजी करताना भारतीय खेळाडू अपयशी ठरतात हाच शिक्का पुसण्याचा विराटचा हा प्रयत्न असेल.  एक ऑगस्टपासून भारत इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वी जूनमध्ये विराट कोहली काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट कोहली सरे या क्लबकडून काऊंटी खेळणार आहे. यासाठी विराट कोहलीनं अफगानिस्तान बरोबरच्या एकमेव कसोटीतून माघार घेतली आहे.

इंग्लंडच्या धर्तीवर आपल्या कटू आठवणी विसरून आपल्या बॅटमधून मोठी धावसंख्या उभारण्यास तो सज्ज आहे. आयपीएल संपल्यानंतर कोहली लगेचच इंग्लंड दौऱ्याआधी काऊंटी क्रिकेटसाठी रवाना होणार आहे. दौऱ्याआधी तिथली विकेट, हवामान आणि वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी हा निर्णय घेतलाय.  इंग्लंडमध्ये भारत पाच कसोटी, तीन वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.  

 

टॅग्स :विराट कोहलीइंग्लंडकौंटी चॅम्पियनशिपअफगाणिस्तान