श्रीलंकेचा सामना करण्यापूर्वी विराट कोहलीनं बदलला लुक; पाहा फोटो

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणखी एका वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 09:32 IST2020-01-03T09:32:00+5:302020-01-03T09:32:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virat Kohli shares new haircut ahead of Sri Lanka series - See PHOTOS | श्रीलंकेचा सामना करण्यापूर्वी विराट कोहलीनं बदलला लुक; पाहा फोटो

श्रीलंकेचा सामना करण्यापूर्वी विराट कोहलीनं बदलला लुक; पाहा फोटो

भारतीय संघ 2020 वर्षाची सुरुवाती श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेनं करणार आहे. 5 जानेवारीला मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ गुरुवारी गुवाहाटी येथे दाखल झाला, तर टीम इंडिया आज किंवा उद्या दाखल होईल. या मालिकेतून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणखी एका वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी सज्ज असेलच. पण, मैदानावरील कामगिरीपूर्वी कोहली नववर्षात नवा लुक केला आहे. त्याच्या या नव्या लुकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धची वन डे मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचे शिलेदार ख्रिस्मस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी भटकंतीला गेले होते. कोहली पत्नी अनुष्का शर्मासह स्वित्झर्लंडला गेला होता आणि त्यानं सोशल मीडियावर फोटोही शेअर केले होते. मुंबईत परतल्यानंतर 31 वर्षीय कोहलीनं आपला लुक बदलला. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलीम हाकिम यांच्याकडून कोहलीनं हा लुक बदलून घेतला आहे. 

भारत - विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

श्रीलंका - लसिथ मलिंगा ( कर्णधार), दानुष गुणथिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, कुसल पेरेरा, निरोशान डिकवेला, धनंजया डी सिल्वा, इसुरू उदाना, भानुका राजपक्ष, ओशाडा फर्नांडो, वनिंदू हसरंगा, लाहीरु कुमारा, कुसल मेंडीस, लक्षण संदाकन, कसून रजिथा. 


वेळापत्रक
5 जानेवरी, भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला टी20 सामना(गुवाहाटी)
7 जानेवरी, भारत  विरुद्ध  श्रीलंका, दूसरा टी20 सामना(इंदूर)
9 जानेवरी, भारत  विरुद्ध श्रीलंका, तिसरा टी20 सामना (पुणे)

Web Title: Virat Kohli shares new haircut ahead of Sri Lanka series - See PHOTOS