Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली म्हणतो, मी माफी मागणार नाही...

काही दिवसांपूर्वी कोहलीने एका चाहत्याला, '... देश सोडून जा' असे म्हटले होते. त्यानंतर कोहली सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 20:52 IST

Open in App
ठळक मुद्देएका चाहत्याने काही दिवसांपूर्वी मला परदेशातील काही खेळाडू आवडतात, असे म्हटले होते. या विधानावर कोहली चांगलाच चिडला.या चाहत्याला कोहलीने थेट देश सोडून जाण्यास सांगितले होते.

मुंबई : विराट कोहली किती आक्रमक आणि हटवादी आहे, याचा प्रत्यय एका पत्रकार परिषदेमध्ये आला. काही दिवसांपूर्वी कोहलीने एका चाहत्याला, '... देश सोडून जा' असे म्हटले होते. त्यानंतर कोहली सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता.

एका चाहत्याने काही दिवसांपूर्वी मला परदेशातील काही खेळाडू आवडतात, असे म्हटले होते. या विधानावर कोहली चांगलाच चिडला. या चाहत्याला कोहलीने थेट देश सोडून जाण्यास सांगितले होते. त्यानंतर कोहली परदेशात जाऊन लग्न करतो, तर त्याने देश सोडून जावा, अशी टीकाही त्याच्यावर काही जणांन केली होती.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी एक पत्रकार परीषद झाली. या परीषदेमध्ये एका पत्रकाराने कोहलीला याबाबत विचारले होते. त्यावर कोहली म्हणाला की, " मी याप्रकरणी यापूर्वीच माझे म्हणणे मांडले आहे. त्यामुळे आता माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. "

टॅग्स :विराट कोहली