Join us

मागील ८ वर्षांत वजन ग्रॅमनेही वाढले नाही; विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहली त्याच्या खेळीमुळे प्रसिद्ध आहे. पण, तो त्याच्या फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे. विराट जगातील सर्वात चपळ क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 15:17 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहली त्याच्या खेळीमुळे प्रसिद्ध आहे. पण, तो त्याच्या फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे. विराट (Virat Kohli) जगातील सर्वात चपळ क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. विराटने त्याच्या फिटनेसबद्दलचे गपीत एका मुलाखतीत सांगितले आहे. 

एका मुलाखतीमध्ये त्याला उंची आणि वजनाबाबद प्रश्न विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, उंची ५ फूट ११ इंच आहे. वजनाबाबत विराटने मोठा खुलासा केला. गेल्या ८ वर्षांत त्याचे वजन केवळ ५०० ग्रॅमने वाढले आहे. म्हणजेच गेल्या ८ वर्षांत त्याचे वजन ७४.५ किलोवरून ७५ किलो झाले आहे.

विराट कोहली मिठाई खाणे टाळतो, पण, मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की त्याला मालवा पुडिंग आवडते जी दक्षिण आफ्रिकेची मिठाई आहे. झहीर खानने त्याला ही डिश खायला सांगितली होती, असंही विराट म्हणाला.  मला देशी मिठाईमध्ये गाजराचा हलवा खूप आवडतो,  तो घरी नाचणीची खीरही बनवतो, जो त्याला खूप आवडतो, असेही त्याने सांगितले.

T20 World Cup, IND vs ZIM : चार चेंडूंत विराट कोहली, लोकेश राहुल माघारी परतले; झिम्बाब्वेने भारताला ३ मोठे धक्के दिले, Video 

कोहली टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकाची सुरुवात केली आणि त्या खेळीने लाखो चाहत्यांची मने जिंकली. T20 विश्वचषक स्पर्धेत दोनदा 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' ठरलेला तो एकमेव खेळाडू आहे. त्याने तापर्यंत तीन अर्धशतके केली आहेत.

टॅग्स :विराट कोहलीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App