Virat Kohli after defeat : विराट कोहलीनं निशाणा साधला; पराभवाचं कारण सांगताना रहाणे-पुजाराच्या भविष्याबाबत इशारा दिला...

Virat Kohli after defeat :  India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : दक्षिण आफ्रिकेनं तिसरी कसोटी ७ विकेट्स राखून जिंकताना मालिका २-१ अशी खिशात घातली. तीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 05:57 PM2022-01-14T17:57:46+5:302022-01-14T18:02:25+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli said "Batting has let us down in last 2 Tests, there is no running away, it's tough to tell now what is the future of Rahane & Pujara now | Virat Kohli after defeat : विराट कोहलीनं निशाणा साधला; पराभवाचं कारण सांगताना रहाणे-पुजाराच्या भविष्याबाबत इशारा दिला...

Virat Kohli after defeat : विराट कोहलीनं निशाणा साधला; पराभवाचं कारण सांगताना रहाणे-पुजाराच्या भविष्याबाबत इशारा दिला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli after defeat :  India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : दक्षिण आफ्रिकेनं तिसरी कसोटी ७ विकेट्स राखून जिंकताना मालिका २-१ अशी खिशात घातली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून मालिका गमावण्याची भारताची ही चौथी वेळ ठरली. यापूर्वी १९८४-८५ मध्ये इंग्लंड ( Home), २००६-०७ मध्ये दक्षिण आफ्रिका ( Away), २०१२-१३मध्ये इंग्लंड ( Home) यांच्याविरुद्ध भारताला मालिका पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यानंतर विराट कोहलीनं या पराभवामागचं कारण सांगितलं. 

भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २१० धावाच करता आल्या, परंतु त्यांच्या गोलंदाजांनी भारताचा दुसरा डाव १९८ धावांवर गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेनं २१२ धावांचे माफक लक्ष्य पार करून मालिका २-१ अशी खिशात घातली. किगन पीटरसन हा आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला. आफ्रिकेनं ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका जिंकली.  डीन एल्गर ९६ चेंडूंत ३० धावा केल्या. किगन पीटसरन ११३ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावांवर माघारी परतला. पेव्हेलियनच्या दिशेनं पीटरसनचं साऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहुन कौतुक केलं. या विकेटनं भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या, पण ड्युसेन व टेम्बा बवुमानं तसं होऊ दिले नाही. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ड्युसेन ४१, तर बवुमा ३२ धावांवर नाबाद राहिले. 

विराट कोहली काय म्हणाला?

  • ही दर्जेदार कसोटी मालिका ठरली.. पहिला सामना आमच्यासाठी चांगला गेला, परंतु दक्षिण आफ्रिकेनं अविश्वसनीय पुनरागमन केलं. एकाग्रता हरवल्याचा फटका आम्हाला बसला आणि त्यांनी तिच संधी हेरली. ते या जेतेपदाचे खरे मनसबदार आहेत. परदेशात मिळणाऱ्या संधीचं सोनं करा, हे मी आधीच सांगितलं होतं. आम्ही जेव्हा जेव्हा संधी हेरली तेव्हा परदेशात मालिका जिंकली, परंतु यावेळेस आम्ही अपयशी ठरलो, असे विराट म्हणाला.
  • त्यानं पुढे सांगितले, मोक्याच्या क्षणी उडालेली घसरगुंडी महागात पडली. फलंदाजांच्या अपयशामुळे ही मालिका गमावली, या व्यतिरिक्त दुसरे कारण असू शकत नाही. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आमच्यावर दडपण निर्माण करण्यात यश मिळवलं आणि त्यातूनच चुका झाला. फलंदाजीच्या बाबीवर आता लक्ष द्यायला हवं, त्यापासून पळून चालणार नाही. आम्ही यंदा आफ्रिकेला नमवू अशी लोकांची अपेक्षा होती. पण, आम्ही ते करू शकलो नाही. प्रतिस्पर्धी संघाला या यशाचं श्रेय द्यायला हवं.
  • अखेरच्या दोन्ही कसोटींत फलंदाजांनी निराश केले. रहाणे व पुजारा यांच्या भविष्याबाबत सांगणे अवघड आहे. आम्हाला आता निवड समितीसोबत बसून बोलावे लागेल. या दोघांनी अनेकदा संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी हे दोघं दमदार खेळले आहेत, असेही विराट म्हणाला. 

Web Title: Virat Kohli said "Batting has let us down in last 2 Tests, there is no running away, it's tough to tell now what is the future of Rahane & Pujara now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.