मुंबई - भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. याशिवाय रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही अनफॉलो केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या कृत्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या मैत्रीत कटुता तर आली नाही ना, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे सलामीवीर सपशेल अपयशी ठरले आहेत आणि अशा परिस्थितीत रोहितला संधी मिळायला हवी होती, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत मुरली विजय, लोकेश राहुल व शिखर धवन यांना अपयश आले. त्यामुळे उर्वरीत दोन कसोटींसाठी रोहितच्या नावाचा विचार होणे अपेक्षित होते. मात्र, रोहितला डावलून युवा फलंदाज पृथ्वी शॉला संधी देण्यात आली.
पण, त्याची भरपाई आशिया चषक वन डे स्पर्धेतील संघ निवडताना केली. आशिया चषक स्पर्धेत रोहितकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत विराटला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या गैरहजेरीत रोहित संघाचे नेतृत्व करणार आहे, तर धवन उप कर्णधार असणार आहे. 
![]()