विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या वादात नवीन ठिणगी; हिटमॅननं उचललं टोकाचं पाऊल

वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 11:36 IST2019-07-26T11:36:10+5:302019-07-26T11:36:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virat Kohli-Rohit Sharma rift rumours: Latest Instagram activity adds fuel to fire | विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या वादात नवीन ठिणगी; हिटमॅननं उचललं टोकाचं पाऊल

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या वादात नवीन ठिणगी; हिटमॅननं उचललं टोकाचं पाऊल

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर आला होता. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एकाधिकारशाहीमुळे संघातील काही वरिष्ठ खेळाडू नाराज होते. पण, या सर्व अफवा असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) सांगण्यात आले. पण, कोहली अन् रोहित यांच्यातील वादाच्या अफवेत ठिणगी टाकणारा प्रसंग घडला आहे. आतापर्यंत रोहित आणि कोहली या दोघांनीही त्यांच्यातील मतभेदावर कोणतेही वक्तव्य केले नाही.  

पण, रोहितनं सोशल मीडियावर कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला अनफॉलो केल्यानं या वादाला नवा रंग येण्याची चर्चा सुरू झाली आहे. रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते.पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. पण, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही. 


अनुष्काही रोहित आणि रितिका या दोघांनाही इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही. तसेच रितिकाही कोहली व अनुष्काला फॉलो करत नाही. 

Web Title: Virat Kohli-Rohit Sharma rift rumours: Latest Instagram activity adds fuel to fire