Virat Kohli Rohit Sharma, Aus vs Ind 4th Test at MCG: भारतीय संघाचे दोन दिग्गज फलंदाज म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. रोहित आणि विराट यांच्यासाठी २०२४ हे वर्ष अतिशय खास ठरलं. या दोघांनी एकत्रित प्रयत्नांनी आपल्या संघाला टी२० विश्वचषक मिळवून दिला. भारतीय संघाला तब्बल १७ वर्षांनी टी२० विश्वविजेतेपद पुन्हा आपल्या नावे करता आले. पण कसोटी क्रिकेटच्या बाबतीत विराट आणि रोहित यांच्यासाठी हे वर्ष अतिशय वाईट गेले. भारतीय संघाचे दोन दिग्गज कसोटीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरले. पाहा दोघांची आकडेवारी.
रोहितच्या वर्षभरात केवळ ६१९ धावा
भारतीय संघाचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी २०२४ चे वर्ष अतिशय वाईट गेले. रोहितने संपूर्ण वर्षभरात २६ कसोटी डावात फलंदाजी केली. त्यात रोहितने केवळ २४.७६ च्या सरासरीने केवळ ६१९ धावा केल्या. रोहित शर्माला २६ डावांत फक्त २ शतके आणि २ अर्धशतके झळकावता आली. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या चार कसोटीतही त्याने घोर निराशा केली. रोहित पहिल्या कसोटीत अनुपलब्ध होता. पण दुसऱ्या कसोटीपासून त्याने आतापर्यंत खेळलेल्या पाच डावांत अनुक्रमे ३,६,१०, ३,९ अशी धावा केल्या.
![]()
विराटला ५००चा आकडा गाठणं झालं कठीण
विराट कोहलीने यंदाच्या वर्षांत एकूण १९ कसोटी डाव खेळले. त्यात त्याला केवळ १ शतक आणि एक अर्धशतक मारता आले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल १९ डाव खेळूनही त्याला ५०० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. विराटने २४.५२ च्या सरासरीने केवळ ४१७ धावा केल्या. बॉर्डर गावसकर मालिकेतदेखील एक शतक वगळता विराट पूर्णत: फ्लॉप ठरला. शतकी खेळी वगळता विराटने ५, ७, ११, ३, ३६,५ अशा धावा केल्या.
Web Title: Virat Kohli, Rohit Sharma flop in Test cricket for calender year 2024 See stats Aus vs Ind test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.