Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!

IPL 2025 Final: आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने एक मोठा विक्रम रचला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 21:34 IST2025-06-03T21:32:28+5:302025-06-03T21:34:27+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli rewrites IPL record books, achieves this historic feat against Punjab Kings | Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!

Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने एक मोठा विक्रम रचला. विराट कोहलीने शिखर धवनचा आयपीएल इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम मोडीत काढला. कोहली त्याच्या आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता.

पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात विराटने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश आहे. या कामगिरीसह विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला. विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २६७ सामन्यात एकूण ७७१ चौकार मारले आहेत. तर, शिखर धवनने २२२ सामन्यात ७६८ चौकार मारले आहेत. धवन आता आयपीएलमधून निवृत्त झाला आहे.

विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यानंतर डेव्हिड वॉर्नर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये ६६३ चौकार मारले आहे. त्यानंतर रोहित शर्मा ६४० चौकारांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ५१४ चौकाराची नोंद आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
१) विराट कोहली- ७७१
२) शिखर धवन- ७६८
३) डेव्हिड वॉर्नर- ६६३
४) रोहित शर्मा- ६४०
५) अजिंक्य रहाणे- ५१४

Web Title: Virat Kohli rewrites IPL record books, achieves this historic feat against Punjab Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.