Join us  

कोहली खेळाडूशी भिडला, त्याला आयसीसीने धारेवर धरला

या गोष्टीचा विपरीत परीणाम कोहलीच्या पुढील सामन्यांवर होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 6:34 PM

Open in App

बंगळुरू, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात पराबव पत्करावा लागला. पण या पराभवाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी एक वाईट बातमी आहे. कारण या सामन्यात कोहली मैदानात दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूबरोबर भिडला होता. पण हे वर्तन क्रिकेटसारख्या सभ्य गृहस्थांच्या खेळाला शोभेसे नाही. त्यामुळेच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) कोहलीला चांगलेच धारेवर धरले आहे.

हा सामना बंगळुरुमध्ये झाला. भारताच्या संघाची पहिली फलंदाजी होती. ही गोष्ट घडली ती पाचव्या षटकामध्ये. ब्युरन हेंड्रीक्स यावेळी गोलंदाजी करत होता. या षटकात धाव घेतला कोहली त्याच्या जवळून धावत गेला आणि त्यानंतर त्याच्या खांद्याला जोरदार टक्कर मारली. ही गोष्ट मैदानावरील पंचांसहित साऱ्यांनी पाहिली. यावेळी सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट आली आणि त्यांनी कोहलीला याबाबत जब विचारला. जेव्हा ही गोष्ट पुन्हा पाहण्यात आली तेव्हा त्यामध्ये कोहलीची चूक असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता आयसीसीने कोहलीवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. आता कोहलीवर दंड आकारण्यात येऊ शकतो, त्याचबरोबर त्याला डिमेरिट पॉइंटही देण्यात येऊ शकतो. या गोष्टीचा विपरीत परीणाम कोहलीच्या पुढील सामन्यांवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

India vs South Africa : कोहलीवर आली तोंड लपवण्याची वेळ, पराभवामुळे नाही तर या कारणामुळे...क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रीक्स यांनी आफ्रिकेला विजय मिळवून दिला.  या दोघांनी रचलेल्या पायावर आफ्रिकेनं विजय साजरा केला अन् मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या घरच्या मैदानावर विराट कोहलीला पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेनं 9 विकेट राखून हा सामना जिंकला. डी कॉकने 52 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या. 

या सामन्यात भारताच्या फलंदाजांना अपयश आले. सलामीवीर शिखर धवन ( 36) वगळला, तर अन्य कुणालाही यापेक्षा मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या पाच षटकांत खेळपट्टीवर हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा असूनही भारतीय संघ कसाबसा 134 धावांपर्यंतच मजल मारू शकला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. पण, भारतीय गोलंदाजांना तसे करता आले नाही. 

डी कॉक आणि हेंड्रीक्स यांनी पहिल्या 6 षटकांत बिनबाद 43 धावा केल्या. हार्दिक पांड्यानं 11व्या षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानं हेड्रीक्सला बाद केले. कोहलीनं सुपर कॅच घेत हेंड्रीक्सला माघारी पाठवले. क्विंटन डी कॉकनं 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. डी कॉकनं कर्णधार म्हणून सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या. पण, या सामन्याचे चित्र पालटले असते. सामन्याच्या 6व्या षटकात दीपक चहरने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर हेंड्रीक्सच्या पायचीतची अपील झाली. पंचांनी चहर व यष्टिरक्षक रिषभ पंतच्या अपीलला दाद दिली नाही. त्यानंतर कोहलीनं चहरचा आत्मविश्वास पाहून DRS घेतला. पण चेंडू तिसऱ्या स्टम्पच्या बाहेर जात असल्याचे निदर्शनास आले आणि कोहलीनं आपलं तोंड लपवले.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका