भिऊ नकोस मीच नव्हे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत! नव्या कॅप्टनसाठी किंग कोहलीचा खास मेसेज

या खास शब्दांत किंग कोहलीनं नव्या कॅप्टनला दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:04 IST2025-02-13T12:51:35+5:302025-02-13T13:04:29+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli Reacts After RCB Choose Rajat Patidar Over Him As New Captain For IPL 2025 | भिऊ नकोस मीच नव्हे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत! नव्या कॅप्टनसाठी किंग कोहलीचा खास मेसेज

भिऊ नकोस मीच नव्हे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत! नव्या कॅप्टनसाठी किंग कोहलीचा खास मेसेज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Reacts After RCB Choose Rajat Patidar Over Him As New Captain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं नव्या हंगामासाठी नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामात रजत पाटीदार हा आरसीबी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. २००८ पासून आतापर्यंतचा तो आरसीबीचा आठवा कर्णधार आहे. देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमध्ये आपल्या बॅटिंगसह विशेष छाप सोडणाऱ्या नव्या कॅप्टनला भारताचा आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीनं खास मेसेज केला आहे. आरसीनं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन विराट कोहलीचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तो नव्या कॅप्टनला शुभेच्छा देताना दिसून येते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

विराट कोहलीचा नव्या कॅप्टनसाठी खास मेसेज

 कोहली हा क्रिकेट जगतात 'विराट' प्रसिद्धी मिळालेला चेहरा आहे. बॅटर आणि कॅप्टन्सीच्या रुपात त्याने विशेष छाप सोडलीये. आयपीएलमध्ये तो आता ३१ वर्षीय नव्या चेहऱ्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. विराट कोहली संघात असताना कॅप्टन्सी करणं हे रजत पाटीदार सारख्या नव्या खेळाडूसाठी एक चॅलेंजिग टास्कच असेल. पण विराट कोहलीनं त्याच्यासाठी खास मेसेज शेअर करत त्याचं ओझं थोडं हलकं केले आहे.  मी आणि इतर संघातील सदस्य तुझ्या पाठीशी असतील, या शब्दांसह किंग कोहलीनं नव्या कॅप्टनला शुभेच्छा दिल्या आहेत. 

रजत पाटीदारबद्दल काय म्हणाला विराट कोहली?

रजत पाटीदारनं आरसीबी संघासाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे, याचा उल्लेखही विराट कोहलीने केला आहे. या फ्रँचायझीतून खेळताना तू दिवसेंदिवस प्रगती केलीस. उत्तम कामगिरीसह आरसीबी चाहत्यांच्या मनात तू घर केलं आहेस. कॅप्टन्सीचा तू हक्कदार आहेस. वेगवेगळ्या भूमिकेत तू स्वत:ला सिद्ध केले आहेत. ही नवी जबाबदारीही तू उत्तमरित्या पार पाडशील; अशा आशयाच्या शब्दांत किंग कोहलीनं नव्या कॅप्टनचं तोंडभरून कौतूक करत त्याला नव्या भूमिकेसाठी पाठींब्यासह  शुभेच्छा दिल्या आहेत. 

नेतृत्वातील कर्तृत्व सिद्ध करण्याची नामी संधी

आरसीबी फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करणं ही एक मोठी जबाबदारी आहे. मी ही भूमिका अनेक वर्षे बजावलीये. गेल्या काही वर्षात फाफ ही भूमिका बजावताना दिसला होता. आता रजत पाटीदारला हा सन्मान मिळाला आहे. तो संघाला आणखी मजबूत करेल, अशी आशाहीही विराट कोहलीनं यावेळी व्यक्त केलीये. विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासून आरसीबीच्या ताफ्यातून खेळतो. जवळपास नऊ वर्षे त्याने या संघाचे नेतृत्व केले आहे. बॅटिंगवर फोकस करण्यासाठी कोहलीनं भारतीय संघासह फ्रँचायझी संघाच्या नेतृत्व सोडले होते. आता या संघाला जेतेपद मिळवून कॅप्टन्सीतील कर्तृत्व सिद्ध करण्याची रजत पाटीदारकडे नामी संधी आहे.
 

Web Title: Virat Kohli Reacts After RCB Choose Rajat Patidar Over Him As New Captain For IPL 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.