Join us

Virat Kohli Glenn Maxwell, IPL 2022 GT vs RCB Live: किंग कोहली, रजत पाटीदारची अर्धशतके, ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी; RCB ने गुजरातला दिलं १७१ धावांचे आव्हान

विराटचा जुना मित्र प्रदीप सांगवानने घेतले २ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:49 IST

Open in App

Virat Kohli Glenn Maxwell, IPL 2022 GT vs RCB Live: माजी कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाज रजत पाटीदार या दोघांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने गुजरात टायटन्सला १७१ धावांचे आव्हान दिले. RCBचा कर्णधार फाफ डु प्लेसिस लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार या दोघांनी ९९ धावांची दमदार भागीदारी केली. याच भागीदारीच्या जोरावर RCB ला मोठी धावसंख्या उभारता आली. गुजरातच्या संघाकडून प्रदीप सांगवानने सर्वाधिक २ बळी टिपले.

टॉस जिंकून RCB ने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार डु प्लेसिस शून्यावर बाद झाला. त्यानंतर विराट-रजत जोडीने चांगली सुरूवात केली. रजत पाटीदारने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार लगावत ५२ धावा केल्या. तर विराट कोहलीने ५३ चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार खेचत ५८ धावा केल्या. या दोघांनंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळीला सुरूवात केली होती. पण १८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार मारल्यावर तो ३३ धावांवर बाद झाला. अखेरच्या टप्प्यात आपला पहिलाच सामना खेळणार महिपाल लोमरॉर याने ८ चेंडूत १६ धावा केल्या.

विराटचा जुना मित्र आणि गुजरातकडून आपला पहिला सामना खेळणारा प्रदीप सांगवान याने गोलंदाजीत आपला ठसा उमटवला. त्याने ४ षटकांत १९ धावा देऊन २ बळी घेतले. मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, राशिद खान आणि राशिद खान चौघांनी १-१ बळी टिपले. ४ षटकात ४२ धावा देणारा अल्झारी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. 

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीग्लेन मॅक्सवेलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App