Join us

चांगल्या खेळासाठी कोहली कायम प्रोत्साहन देतो - रबाडा

मैदानावर रबाडा आणि कोहली यांच्यात अनेकदा लढत झाली असून, तिन्ही प्रकारांमध्ये कोहलीची सरासरी ५०हून अधिक आहे.​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 03:29 IST

Open in App

मुंबई : ‘भारतीय कर्णधार विराट कोहलीमुळे मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी सन्मानजनक आहे,’ असे गौरवोद्गार दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने काढले आहे. मैदानावर रबाडा आणि कोहली यांच्यात अनेकदा लढत झाली असून, तिन्ही प्रकारांमध्ये कोहलीची सरासरी ५०हून अधिक आहे.कोणत्या क्रिकेटपटूचा तू खूप सन्मान करतो आणि कुणामुळे तुला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असा प्रश्न रबाडाला विचारण्यात आला होता. यावर त्याने सांगितले की,‘एकदिवसीय क्रिकेटबाबत सांगायचे झाल्यास मी विराट कोहलीचे नाव घेईन, तो खूप सातत्यपूर्ण कामगिरी करतो.’

टॅग्स :विराट कोहली