भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवड प्रक्रियेत कोहलीच्या मताला किंमत नसणार, सूत्रांची माहिती

भारताच्या मुख्य प्रशिक्षकासह अनेक पदांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. भारताचा नवा प्रशिक्षक कोण असेल याचा निर्णय कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समिती घेणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:42 PM2019-07-18T12:42:11+5:302019-07-18T12:44:11+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli powerless in coach selection process this time, won't have a say: Report | भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवड प्रक्रियेत कोहलीच्या मताला किंमत नसणार, सूत्रांची माहिती

भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवड प्रक्रियेत कोहलीच्या मताला किंमत नसणार, सूत्रांची माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताच्या मुख्य प्रशिक्षकासह अनेक पदांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. भारताचा नवा प्रशिक्षक कोण असेल याचा निर्णय कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समिती घेणार आहे. त्यामुळे यंदा प्रशिक्षक निवड प्रक्रियेत कर्णधार विराट कोहलीचे मत घेतले जाणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळात जे घडले त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

BCCIच्या नियमानुसार रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी पात्रच ठरत नाहीत, कसे ?

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अन्य साहाय्यक प्रशिक्षकांचा करार वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच संपुष्टात आला आहे. पण, बीसीसीआयनं त्यांना वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. हा दौरा 3 ऑगस्टपासून  सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''मागचर्या वेळेस कर्णधार कोहलीनं अनिल कुंबळे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आता होणाऱ्या निवड प्रक्रियेत कोहलीचा सल्ला घेतला जाणार नाही. कपिल देव आणि त्यांची समिती हा निर्णय घेतील.''

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यातील कथित वादावर संघ व्यवस्थापनाचं मोठं विधान 

30 जुलैपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे आणि त्यानंतर प्रशिक्षक कोण असेल, याचा निर्णय घेतला जाणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे आणि ही समिती मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. या समितीचे प्रमुख हे माजी कर्णधार कपिल देव असणार आहेत आणि त्यांच्यासह अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हेही या समितीचे सदस्य आहेत. 

भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक 15 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका मालिकापूर्वी घोषित करण्यात येईल.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी 
रवी शास्त्री हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत आणि या पदासाठी बीसीसीआयनं तीन अटी ठेवल्या आहेत. 
- मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या संघाला दोन ते तीन वर्ष प्रशिक्षक करण्याचा अनुभव असावा. शिवाय त्याने 30 कसोटी किंवा 50 वन डे सामने खेळलेले असावेत
-  फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान 10 कसोटी किंवा 25 वन डे सामने खेळलेले असावेत 
- त्यांचे वय 60 वर्षांहून कमी असावेत

Web Title: Virat Kohli powerless in coach selection process this time, won't have a say: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.