Video : अनुष्का शर्मासह रोमँटिक अंदाजात दिसला विराट कोहली; असा साजरा केला बर्थ डे!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आज आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघासोबत UAEत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 5, 2020 03:59 PM2020-11-05T15:59:56+5:302020-11-05T16:25:56+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli plants a sweet kiss on pregnant wife Anushka Sharma's cheek as they celebrate his birthday in Dubai; Video | Video : अनुष्का शर्मासह रोमँटिक अंदाजात दिसला विराट कोहली; असा साजरा केला बर्थ डे!

Video : अनुष्का शर्मासह रोमँटिक अंदाजात दिसला विराट कोहली; असा साजरा केला बर्थ डे!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आज आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघासोबत UAEत आहे. यंदाचा बर्थ डे विराटसाठी खूप खास आहे. त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रग्नेंट आहे आणि तिनंही पतीचा बर्थ डे दणक्यात साजरा करण्यासाठी कोणतीच कसर सोडलेली नाही. अनुष्काच्या या सप्राईज पार्टीने विराटही रोमँटिक झाला आणि त्यानं रोमँटिक अंदाजात पत्नीचे आभार मानले. विराटच्या बर्थ डे पार्टिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

५ नोव्हेंबर १९८८मध्ये नवी दिल्ली येथे कोहलीचा जन्म झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटनं स्वतःचा ठसा उमटवला आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद, ८, ९, १० आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रम, २८ ते ४३  शतकांचा सर्वात जलद प्रवास, कर्णधार म्हणून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १, २, ३, ४ आणि ५ हजार धावा करणारा फलंदाज, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५, १६, १७, १८, १९, २० आणि २१ हजार धावा करणारा फलंदाज... आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.  

त्यानं ८६ कसोटीत ५३.६२ च्या सरासरीनं ७२४० धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व २२ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. वन डे क्रिकेटमध्ये त्यानं २४८ सामन्यांत ५९.३३च्या सरासरीनं ११८६७ धावा केल्या आहेत. ४३ शतकं व ५८ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ८२ सामन्यांत २७९४ धावा त्यानं केल्या आहेत. शिवाय सर्व प्रकारच्या ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ९ हजार धावा करणारा तो भारताचा पहिलाच फलंदाज आहे.
 

Web Title: Virat Kohli plants a sweet kiss on pregnant wife Anushka Sharma's cheek as they celebrate his birthday in Dubai; Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.