Join us  

Virat Kohli: अखेर विराट कोहलीने किशोर कुमारांच्या बंगल्यात सुरू केले रेस्टॉरंट, पाहा व्हिडिओ...

विराट कोहलीने जुहूमध्ये गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात One Eight Commune नावाचे नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 6:00 PM

Open in App

Virat Kohli: बॉलिवूडचे दिग्गज गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी अनेक सदाबहार गाणी दिली. त्यांची गाणी आजही रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हादेखील किशोर कुमारांचा जबरा फॅन आहे. यामुळेच आता त्याने किशोर कुमार यांचा मुंबईच्या जुहू येथील बंगला किरायाने घेतला आहे. विराटने 5 वर्षांसाठी हा बंगला भाड्याने घेतला असून, यात त्याने एक हाय ग्रेड रेस्टॉरंट सुरू केले आहे. विराटने त्याच्या रेस्टॉरंटचा एक व्हिडिओही शेअर केलाय. 

फार कमी लोकांना माहितीये पण, फिटनेस फ्रीक असलेल्या विराट कोहलीला खाण्यापिण्याचाही खूप शौक आहे. दिल्लीच्या विराटला चोले भटुरे खूप आवडतात. यामुळेचे त्याने क्रिकेटसोबतच त्याची रेस्टॉरंटची चेन सुरू केली आहे. त्याने यापूर्वी दिल्लीत दोन रेस्टॉरंट खरेदी केले आहेत. अन्य प्रमुख शहरांमध्येही तो त्याच्या हॉटेल्सची चेन वाढवणार आहे. 

बुधवारी विराटने त्याच्या 'वन8 कम्युन' या नवीन रेस्टॉरंटची झलक दाखवली. विराटने किशोर कुमार यांच्या 'गौरी कुंज' या बंगल्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहलीसोबत प्रसिद्ध होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलही दिसत आहे. दोघेही या नवीन रेस्टॉरंटला भेट देताना दिसत आहेत. यादरम्यान विराट मनीषला रेस्टॉरंटबाबत माहिती देत आहे.

टॅग्स :विराट कोहलीकिशोर कुमारमनीष पॉल
Open in App