Join us

दोन पेग ड्रिंक घेताच विराटला काय व्हायचं? पत्नी अनुष्का शर्मासमोरच उघड केलं गुपीत; पाहा Video

विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याने आपल्या फिटनेसचे असे मापदंड प्रस्थापित केले आहेत की जगभरातील क्रिकेटपटूही विराटला आदर्श मानतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:25 IST

Open in App

नवी दिल्ली-

विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याने आपल्या फिटनेसचे असे मापदंड प्रस्थापित केले आहेत की जगभरातील क्रिकेटपटूही विराटला आदर्श मानतात. पण यासाठी विराटनं खूप मेहनत घेतली आणि आहाराकडेही लक्ष दिलं. विराटनं नुकतंच पत्नी अनुष्का शर्मासमोर आपलं एक गुपित उघड केलं आहे. ज्या काळात फिटनेसच्या बाबतीत विराट तितका गंभीर नव्हता तेव्हाची एक गोष्ट त्यानं प्रांजळ मनानं कबुल केली आहे. विराटनं याआधीही अनेकवेळा सांगितलं आहे की तो मद्यपान करत नाही पण एक काळ असा होता की तो मद्यपान करायचा.

विराट आणि अनुष्का नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी दोघांना काही प्रश्न विचारण्यात आले. ज्यामध्ये एक प्रश्न होता की पार्टीत डान्स फ्लोअरवर कोण जास्त हंगामा करतं? यावर अनुष्कानं विराटचं नाव घेतलं. खरंतर अनुष्काचं उत्तर पाहून विराटला आश्चर्य वाटलं. कारण त्याच्या मते डान्स फ्लोअरवर अनुष्काची जादू असते असं त्याचं म्हणणं होतं. पण यावेळी विराटनं हेही मान्य केलं की तो आता ड्रिंक करत नाही, पण खूप वर्षांआधी जेव्हा आपण ड्रिंक करायचो तेव्हा दोन पेग घेतले की डान्स फ्लोअर नक्कीच गाजवायचो.

याच मुलाखतीत विराट कोहलीने अनुष्काचं एक गुपित उघड केलं. महत्त्वाच्या तारखा कोण विसरतो हा प्रश्न होता. यावर विराटने अनुष्काचं नाव घेतलं आणि तिनंही त्यास सहमती दर्शवली. अनुष्काने स्वतः सांगितलं की तिची स्मरणशक्ती खूप खराब आहे. विराट म्हणाला, त्याची स्मरणशक्ती थोडी चांगली आहे. यादरम्यान अनुष्कानं सांगितलं की विराटच्या स्मरणशक्तीनंच ती इम्प्रेस झाली होती. विराट आणि अनुष्कानं एका शॅम्पूच्या जाहिरातीत काम केलं होतं आणि तेव्हापासून त्यांची प्रेमकहाणी बहरली. दोघांनी डेट करायला सुरुवात केली आणि २०१७ मध्ये दोघांनी इटलीमध्ये लग्न केलं. दोघांना आज एक मुलगी आहे.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा
Open in App