Join us

विराट कोहली आता झळकला ' या ' मासिकाच्या मुखपृष्ठावर

कोहली हा आता फक्त चाहत्यांपुरता मर्यादीत राहिलेला नाही. तर न्यूयॉर्कमधील एका दिग्गज मासिकाने कोहलीला आपल्या मुखपृष्ठावर जागा दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 18:13 IST

Open in App
ठळक मुद्देइंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये 1 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत साऱ्यांचे लक्ष असेल ते कोहलीवर.

न्यूयॉर्क : क्रीडा विश्वात सध्याच्या घडीला साऱ्यांच्या नजरा आहेत त्या भारताचा कर्णधार विराट कोहलीवर. कोहली हा आता फक्त चाहत्यांपुरता मर्यादीत राहिलेला नाही. तर न्यूयॉर्कमधील एका दिग्गज मासिकाने कोहलीला आपल्या मुखपृष्ठावर जागा दिली आहे.

न्यूयॉर्कमध्ये  ' जी क्यू  ' नावाचे मासिक पुरुषांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. यापूर्वी जुलै महिन्यात फुटबॉलचा ज्वर चढत असताना या मासिकाने ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारला आपल्या मुखपृष्ठावर जागा दिली होती. त्यावेळी नेमारचा मॅगीसारखा हेअरकट हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे या आपल्या खास हेअरकटबरोबरचा त्याचा फोटो या मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर छापला होता.

इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये 1 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत साऱ्यांचे लक्ष असेल ते कोहलीवर. त्यामुळे कोहलीला या मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले आहे. विराटचा हेअरकट आणि दाढी सध्या चर्चेला विषय ठरत आहे आणि बऱ्याच जणांना कोहलीची ही स्टाईल चांगलीच भावली आहे. त्यामुळे आगामी महिन्यात कोहली आर्कषण असल्यामुळे त्याला या मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट