Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS ODI : कोहली, धोनीचा इनडोअर सराव, पाहा व्हिडीओ

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अन्य सहकाऱ्यांनी सिडनीत गुरुवारी कसून सराव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 13:34 IST

Open in App
ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वन डे शनिवारीमहेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीकडे लक्ष

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अन्य सहकाऱ्यांनी सिडनीत गुरुवारी कसून सराव केला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या वन डेसाठी भारतीय खेळाडूंचा सराव सुरू आहे, परंतु गुरुवारी पावसामुळे भारतीय खेळाडूंना इनडोअर सराव करावा लागला. 

वेस्ट इंडिज मालिकेनंतर भारतीय संघाकडून खेळण्यासाठी सज्ज असलेल्या धोनीने नेट मध्ये जोरदार फटकेबाजी केली. रवींद्र जडेजानेही गोलंदाजीचा सराव केला. पाहा व्हिडीओ... कसोटी मालिकेत सहभागी नसलेल्या खेळाडूंचे आजचे हे दुसरे सराव सत्र आहे. भारतीय संघ येथे तीन वन डे सामने खेळणार आहे. पहिला सामना शनिवारी सिडनीवर होणार आहे, तर अन्य दोन सामने अॅडलेड ( 15 जानेवारी) आणि मेलबर्न ( 18 जानेवारी) येथे होतील.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामहेंद्रसिंह धोनीविराट कोहली