देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीतील धमाकेदार कामगिरीनंतर टीम इंडियाची रनमशिन विराट कोहली नॅशनल ड्युटी बजावण्यासाठी तयार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यासाठी विराट कोहली बडोदा येथे दाखल झाला आहे. कोहलीला विमानतळावर पाहताच चाहत्यांनी त्याच्या भोवती गराडा घातल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीतून कोहलीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांना चांगलीच कसरत करावी लागली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् कोहलीभोवती जमली 'विराट' गर्दी
भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसह करणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना गुजरात येथील बडोदा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यासाठी विराट कोहली बडोद्यात दाखल झाला आहे. मात्र, विमानतळावरून बाहेर पडताना तो 'विराट' गर्दीत फसल्याचे पाहायला मिळाले. कोहली विमानतळाबाहेर येताच चाहत्यांनी त्याला चारही बाजूंनी घेराव घातला. चाहते कोहलीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करताना दिसले. बराच वेळ चाललेल्या धावपळीनंतर विराट कोहली अखेर आपल्या कारमध्ये बसला आणि थेट हॉटेलकडे रवाना झाला.
"पैशांपेक्षा देश मोठा"; मुंबईत शिकलेल्या स्टार अँकरने बांगलादेशच्या क्रिकेट करारावर मारली लाथ
कमालीच्या फॉर्ममध्ये आहे किंग कोहली
विराट कोहली हा सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याचा पदरी भोपळा पडला. मात्र त्यानंतर त्याने प्रत्येक सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेत त्याने सलग दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं. देशांतर्गत क्रिकेटमध्येही दोनसामने खेळताना त्याने एक शतक आणि अर्धशतकासह आगामी मालिकेत धमाका करण्यासाठी तयार असल्याचे संकेतच त्याने दिले आहेत.
फक्त वनडेत सक्रीय
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो फक्त वनडेत खेळताना दिसत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोहली दिल्लीच्या संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पण त्याच्या धमाकेदार इनिंग चाहत्यांना अनुभवता आली नव्हती. आता चाहते न्यूझीलंडविरुद्ध त्याची कामगिरी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.