भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पारा चढलेला पाहायला मिळाला. शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) याच्याकडून क्षेत्ररक्षणात चूक झाली आणि इंग्लंडला ओव्हरथ्रोचा एक रन मिळाला. त्यानंतर संतापलेल्या विराट कोहलीनं रागात त्याला शिवी घातली. धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या डावातील 12व्या षटकात हा प्रसंग घडला. नंबर वन बनण्याची संधी गमावली, विराट कोहलीच्या पाच निर्णयानं टीम इंडियाची गोची केली!
पाहा व्हिडीओ...
विराट कोहलीनं ( Virat Kohli) सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. विराट कोहलीनं ४६ चेंडूंत नाबाद ७७ धावा केल्या. त्यानं ८ चौकार व ४ षटकार खेचून १२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. हार्दिक पांड्यानं १७ धावांचे योगदान दिले आणि टीम इंडियानं ६ बाद १५६ धावांचा डोंगर उभा केला. लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर विराटनं आधी रिषभ पंतच्या साथीनं पडझड थांबवली आणि नंतर हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) साथीनं मोठं लक्ष्य उभं केलं.
लोकेश राहुल चॅम्पियन!; सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या मित्राची विराट कोहलीकडून पाठराखणगोलंदाजांना इंग्लंडच्या धावांवर लगाम लावता आला नाही. जोस बटलरनं ( Jos Buttler) यानं एकहाती सामना फिरवला. बटलरनं ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह नाबाद ८३ धावा केल्या. बेअरस्टोनं २८ चेंडूंत ५ चौकारासह नाबाद ४० धावा केल्या. इंग्लंडनं हा सामना ८ विकेट्स व १० चेंडू राखून जिंकला. विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, भर मैदानात लपवावं लागलं तोंड!