RCB to Wear Blue Jersey : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ( Royal Challengers Banglore) संघ आयपीएलच्या प्रत्येक पर्वात एका सामन्यात हिरव्या जर्सीत मैदानावर उतरतो. निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सामाजिक संदेश RCBया सामन्यातून देतो. पण, यंदाच्या पर्वात विराट कोहलीचा संघ हिरव्या नाही तर निळ्या जर्सीत एक सामना खेळताना दिसेल. या निळ्या जर्सीतून RCBचा संघ कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचा सन्मान करणार आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा संदेशही ते देणार आहेत. वीरेंद्र सेहवागचा RCBला सल्ला; विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, ओपनिंगसाठी युवा खेळाडूचं सूचवलं नाव
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) संघाने ७ पैकी ५ सामने जिंकून कमाल केली आहे. RCBच्या अधिकृत सोशल साईटवर याबाबतचे अपडेट्स देण्यात आले आहेत. यात विराट कोहली निळी जर्सी घातलेला पाहायला मिळत आहे.'गेला वर्षभर PPE किट्स घालून कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती एकजुटी दाखवण्यासाठी आयपीएलच्या आगामी एका सामन्यात RCBचा संघ निळ्या जर्सीत मैदानावर उतरणार आहे. '' CSKची निर्दयपणे धुलाई करणारा पहाडाएवढा किरॉन पोलार्ड झाला भावूक; दिवंगत वडिलांच्या आठवणीत आभाळाकडे हात जोडून पाहत राहिला
दरम्यान, भारतात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. त्यामुळे आयपीएलमधूनही काही खेळाडूंनी आधीच माघार घेतली आहे. शनिवारी ३ लाख ९२ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाले आहे. कोरोनाच्या या लढ्यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर, शेल्डन जॅक्सन, जयदेव उनाडकट, निकोलस पूरन, शिखर धवन, अजिंक्य रहाणे यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
![]()
Web Title: Virat Kohli-Led RCB to Wear Blue Jersey in One IPL 2021 Match to Pay Respect to Frontline Heroes During Covid-19 Pandemic
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.