Join us

"विराट कोहली आपल्या कामाप्रती अतिशय प्रामाणिक"

नीरज कुमार : भ्रष्टाचारविरोधी संस्थेच्या माजी प्रमुखांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 05:35 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी संस्थेचे (एसीयू) माजी प्रमुख नीरज कुमार यांनी आपल्या कार्यकाळादरम्यान स्टार विराट कोहलीच्या कामाचे कौतुक केले. ‘कोहलीमध्ये आपल्या कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा अतुलनीय आहे,’ असे नीरज यांनी सांगितले. 

दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरज यांनी २०१५ ते २०१८ दरम्यान बीसीसीआयसोबत काम केले होते. बीसीसीआय एसीयूचे प्रमुख म्हणून त्यांना क्रिकेटपटूंसह नियमितपणे संपर्कात राहणे गरजेचे होते. यासाठी त्यांना क्रिकेटपटूंकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला. नीरज यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘जवळपास सर्वच क्रिकेटपटू चांगले होते. कोणालाही त्यांच्यावर गर्व वाटला असता, त्या सर्व क्रिकेटपटूंनी मला सन्मान दिला. पण, दोन लोक असे आहेत, ज्यांच्याबाबत फारसे बोलू शकत नाही. ते म्हणजे भुवनेश्वर कुमार आणि अजिंक्य रहाणे. उत्कृष्ट लोक, सज्जन व्यक्ती.’कोहलीविषयी नीरज म्हणाले की, ‘क्रिकेटमध्ये विराटमध्ये कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा अतुलनीय आहे. ज्या प्रकारे तो आपला सराव करतो, ते शानदार आहे.’ काही क्रिकेटपटू अपशब्दांचा वापर करतात का, यावर त्यांनी सांगितले की, ‘होय, काही खेळाडू अपशब्दांचा वापर करतात. पण मला मिळालेल्या माहितीनुसार ते अशाच भाषेत बातचीत करतात. पण, या सर्वांनी मला बीसीसीआय सदस्यांच्या तुलनेत खूप सन्मान दिला.’ आयपीएस अधिकारी नीरज जेव्हा दिल्ली पोलिसचे प्रभारी होते, तेव्हा त्यांच्याच मार्गदर्शनाखालील पथकाने एस. श्रीसंत आणि राजस्थानचे त्याचे सहकारी खेळाडू अजित चंदिला आणि अंकित चव्हाणला स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक केली होती.

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल २०२४