Join us

कोहलीला अजून बरंच काही शिकायचं आहे; गावस्करांचा सणसणीत टोला

क्षेत्ररक्षण कसे लावायचे असते, त्यानुसार गोलंदाजी कशी करायची असते, हे कोहलीला अजूनही शिकावे लागणार आहे, असे गावस्कर म्हणाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 20:01 IST

Open in App
ठळक मुद्देमालिकेनंतर कोहलीने ज्यापद्धतीने पत्रकारांना उत्तर दिले, ते देखील कर्णधारा शोभनीय नव्हते - गावस्कर

मुंबई : विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, असा मानणारा एक वर्ग आहे. काही झालं तरी कोहलीचे गोडवे ते भक्तांसारखे गात असतात. पण या साऱ्यांना सणसणीत टोला हाणला आहे तो भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी.

इंग्लंडमधील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. कसोटी मालिकेत तर भारताला 1-4 असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतरही आमचाच संग सर्वोत्तम आहे, असे कोहली म्हणत होता. यावरही गावस्कर यांनी टिप्पणी केली आहे.

गावस्कर म्हणाले की, " कोहलीला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. क्षेत्ररक्षण कसे लावायचे असते, त्यानुसार गोलंदाजी कशी करायची असते, हे कोहलीला अजूनही शिकावे लागणार आहे. त्याला परिपक्व होण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहे. मालिकेनंतर कोहलीने ज्यापद्धतीने पत्रकारांना उत्तर दिले, ते देखील कर्णधारा शोभनीय नव्हते."

टॅग्स :विराट कोहलीसुनील गावसकर