Join us  

ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली अनुष्काबरोबर गेला सुट्टीवर; पोस्ट केला खास फोटो...

कोहली आणि अनुष्का यांचा हा फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:56 PM

Open in App

मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यातील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्माबरोबर सुट्टीवर गेला आहे. याबाबतची माहिती दस्तुरखुद्द कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून दिली आहे. कोहली आणि अनुष्का यांचा हा फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर विराट हा पत्नी अनुष्काबरोबर फिरायला गेला आहे. या सुट्टीवर असताना विराटने आपल्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर एक रोमँटिक कमेंटही लिहिली आहे. या फोटोवर कोहलीने, ' आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीबरोबर कायम चालत राहण्याचा आनंद काही औरच असतो.' 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक कसोटी सामन्यात विजय मिळवला. या विजयासह कोहलीने देशवासियांना छान भेट दिली. पण कोहलीला यावेळी खास सरप्राइज दिलं ते त्याची पत्नी अनुष्का शर्माने. 

विराट सामना संपल्यावर कोलकाता येथून घरी यायला निघाला. मुंबईच्या एअरपोर्टवर तो दाखल झाला आणि तिथे भेटून अनुष्काने कोहलीला सरप्राइज दिले.

कोहली जेव्हा एअरपोर्टवर दाखल झाला तेव्हा अनुष्का आपल्या गाडीतून बाहेर पडली. आपल्याला पिक अप करायला अनुष्का येईल, असे कोहलीला वाटले नव्हते. त्यामुळे त्याने जेव्हा अनुष्काला पाहिले तेव्हा तोदेखील चकित झाला. अनुष्का कोहलीजवळ गेली आणि त्याला मिठी मारली.

भारताच्या 'या' खेळाडूला पकडणं आहे कठिण, विराट कोहलीचा खुलासाभारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक सामना पार पडला. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खुलासा केला आहे. भारताच्या एका खेळाडूला पकडणं कठिण आहे, असे वक्तव्य कोहलीने सामना संपल्यावर केले आहे.

कोहली म्हणाला की, " खेळाडूसाठी तंदुरुस्ती महत्वाची असते. तंदुरूस्तीसाठी आम्ही सराव करतो. पण सरावामध्ये एका खेळाडूला पकडणं सोपं नाही आणि तो खेळाडू आहे रवींद्र जडेजा. कारण जडेजा ज्यापद्धतीने सराव करतो, त्याला तोड नाही."

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध बांगलादेश