कोरोना व्हायरसमुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देत आहेत. त्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं 'TrimAtHome' challenge सुरू केला आहे, तर महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं स्वतःच स्वतःचे केस कापले आहेत. या दोघांचा नवा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, विराट आणि सचिन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेल्या मोहीमेला पाठींबा दर्शविला आहे. घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रविवारी 100 नंबर ही सुविधा सुरू केल्याची माहिती दिली. विराट, सचिनसह अनेक सेलिब्रेटिंनी त्यांच्या सोशल मीडियावरून ही माहिती त्यांच्या फॅन्सपर्यंत पोहोचवली.