Join us

Virat Kohli 1st Ball Duck, IPL 2022 SRH vs RCB Live: विराट कोहलीचं चाललंय काय? सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर OUT

विराटला गेल्या सामन्यातही लखनौने पहिल्या चेंडूवर केलं होतं बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 21:03 IST

Open in App

Virat Kohli 1st Ball Duck, IPL 2022 SRH vs RCB Live: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि RCBचा दमदार फलंदाज विराट कोहली याची यंदाच्या IPLमधील खराब कामगिरी अद्यापही सुरूच आहे. २०१९ नंतर एकही शतक न लगावलेला विराट कोहली गेली दोन वर्षे फॉर्मशी झगडत आहे. मधल्या काळात त्याने आफ्रिका दौऱ्यावर दोन अर्धशतके केली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. IPL 2022 मध्येही कोहलीला फारशी चमक दाखवता आलेली नाही. तशातच सलग दोन सामन्यात विराट कोहलीवर पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होण्याची वेळ आली.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यात दुश्मंता चमीरा याने विराट कोहलीला पहिल्याच चेंडूवर झेल देण्यास भाग पाडले होते. त्यामुळे तब्बल पाच ते सहा वर्षांनी विराट IPLमध्ये पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. पण आज सुरू असलेल्या सामन्यातही त्याच्यावर हीच वेळ आली. हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मार्को जेन्सनच्या पहिल्या आणि सामन्याच्या दुसऱ्या षटकात विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला. स्विंग झालेला चेंडू विराटला कळलाच नाही. त्यामुळे तो मार्करमच्या हाती झेल देऊन बाद झाला.

दरम्यान, मार्को जेन्सनची ओव्हर खूपच चांगली गेली. एकाच षटकात त्याने आधी फाफ डू प्लेसिस, त्यानंतर विराट कोहली आणि शेवटच्या चेंडूवर अनुज रावत माघारी धाडले. त्यामुळे RCB ची अवस्था दुसऱ्या षटकाअखेरीस ३ बाद ८ धावा अशी झाली होती.

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद
Open in App