Join us

Virat Kohli Spirit of Cricket Video, IPL 2022: विराट फलंदाजीत नापास पण खिलाडूवृत्तीत १०० टक्के पास; पाहा किंग कोहलीने नक्की असं काय केलं...

डावाच्या पहिल्याच षटकात घडला तो प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 21:56 IST

Open in App

Virat Kohli Spirit of Cricket Video, IPL 2022: राजस्थान रॉयल्स विरोधातील 'करो या मरो'च्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने प्रथम फलंदाजी केली. माजी कर्णधार विराट कोहली सलामीला फाफ डू प्लेसिस सोबत फलंदाजीला आला. त्याने पहिल्याच षटकात एक षटकारही मारला, पण दुसऱ्या षटकात त्याला माघारी परतावे लागले. अवघ्या ७ धावा काढून तो तंबूत परतला. पण इतक्या छोटाशा खेळीतही त्याने चाहत्यांची मनं जिंकली.

शुक्रवारी Qualifier 2 च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स समोर विराट कोहली 'फेल' ठरला. विराटने सलामीला येऊन आपला आक्रमक अंदाज दाखवून दिला होता. पण दुसऱ्याच षटकांत त्याला माघारी परतावे लागले. या हंगामात विराटने दोन अर्धशतकी खेळी वगळता मोठी धावसंख्या केलीच नाही. त्यामुळे विराटसाठी यंदाचा हंगाम हा अतिशय वाईट ठरल्याचेच दिसून येत आहे. पण सामन्यात पहिल्या षटकात धाव घेताना विराटच्या अंगाला लागून चेंडू मिस फिल्ड झाला. त्यावेळी संधी असूनही विराटने दुसरी धाव घेतली नाही. त्याने खेळाप्रति आदर आणि खिलाडीवृत्ती दाखवून दिली. पाहा व्हिडीओ-

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ- विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (डब्ल्यू), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज

राजस्थान रॉयल्स संघ- यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीध कृष्णा, ओबेड मॅकॉय, युझवेंद्र चहल

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरजोस बटलर
Open in App