Virat Kohli New Tattoo Meaning and Photo: मॉडर्न क्रिकेट जगतातील किंग विराट कोहली IPL स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडेत सक्रीय असणाऱ्या कोहली पुन्हा एकदा टी-२० मध्ये फटकेबाजी करताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेआधी कोहली नव्या टॅटूमुळे चर्चेत आला आहे. Aliens Tattoo India च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून कोहलीच्या डाव्या हातावरील टॅटू काढतानाचा खास क्षण शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आणखी एक अर्थपूर्ण टॅटू
२८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १९ व्या व्या हंगामात कोहली पुन्हा मैदानात उतरणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गत चॅम्पियन RCB संघ सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध भिडणार आहे. त्याआधी कोहली आपल्या शरीरावर आणखी एक अर्थपूर्ण टॅटू काढण्याला पसंती दिली आहे.
शब्दाला जागला हार्दिक पांड्या! वर्ल्ड कपसाठी मदत करणाऱ्या वानखेडेच्या ग्राउंड स्टाफला दिलं 'स्पेशल गिफ्ट'
हा नवा टॅटू फक्त स्टाईल स्टेटमेंटचा भाग नाही तर....
हा नवा टॅटू फक्त शरीरावर आणखी एक डिझाइन काढून स्टाईल स्टेटमेंटमध्ये नवी भर घालण्यापुरता मर्यादीत नाही. तर त्यामागे खास अर्थ दडला आहे. टॅटू स्टुडिओच्या मते, हा टॅटू कोहलीच्या आयुष्याच्या प्रवासाचं प्रतीक आहे. त्याच्या व्यक्तीमत्वाचं प्रतिबिंब त्यात अधोरेखित होते.
फुल स्लीव्ह टॅटूची खासियत (Virat Kohli New Tattoo Meaning)
या टॅटूमध्ये कोहलीच्या वैयक्तिक परिवर्तनाचा प्रवास दिसून येतो. आयुष्यातील विविध टप्प्यांवर त्याने शिस्त, एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जुन्या गोष्टी मागे सोडत स्वतःला नव्याने घडवलं. मात्र काही गोष्टी अधिक मजबूत झाल्या आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वात नव्या पैलूंची भर पडली. या सर्वांचा संगम म्हणजे त्याचा हा नवा फुल स्लीव्ह टॅटू आहे. कोहलीचा डाव्या हातावर आधीपासूनच वेगवेगळे टॅटू काढलेले होते. काही जुने, काही अपूर्ण, तर काही आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या टॅटूला आता अर्थपूर्ण फिनिशिंग टच देण्यात आला आहे. या नव्या टॅटूसाठी विशेष नियोजनाने काम करण्यात आलं.
तो मैदानाबाहेर स्टाईल स्टेटमेंटचाही बादशहा
विराट कोहली हा मैदानावरील दमदार कामगिरीइतकाच मैदानाबाहेरील स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानात उतरण्यापूर्वी तो सरावाप्रमाणेच आपल्या लूकवरही मेहनत घेताना अनेकदा दिसला आहे. विविध हेअरस्टाईलमुळे लक्ष वेधून घेतल्यानंतर आता त्याचा नवा टॅटू चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.