Join us

Virat Kohli, IPL 2022 RR vs RCB: विराट कोहली पुन्हा FAIL ! दुसऱ्याच ओव्हरमध्ये झेल देऊन परतला माघारी

विराटने पहिल्या षटकात सिक्सर लगावला, पण नंतर लगेचच तो झेलबाद झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 20:10 IST

Open in App

Virat Kohli, IPL 2022 RR vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यंदाच्या हंगामात फारसा प्रभाव पाडू शकला नव्हता. शुक्रवारी Qualifier 2 च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स समोरही विराट कोहली 'फेल' ठरला. विराटने सलामीला येऊन आपला आक्रमक अंदाज दाखवून दिला होता. पण दुसऱ्याच षटकांत त्याला माघारी परतावे लागले. या हंगामात विराटने दोन अर्धशतकी खेळी वगळता मोठी धावसंख्या केलीच नाही. त्यामुळे विराटसाठी यंदाचा हंगाम हा अतिशय वाईट ठरल्याचेच दिसून येत आहे.

विराट सुरूवातीच्या सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. पण त्याच्या फॉर्मचे कारण देत त्याला सलामीवीर म्हणून बढती मिळाली. तरीही विराटची कामगिरी फारशी सुधारलीच नाही. आजच्या सामन्यात सलामीला येत त्याने ट्रेंट बोल्टच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला. त्यामुळे विराट आज वेगळ्या मानसिकतेने खेळणार असं वाटत होतं. पण दुसऱ्याच षटकांत प्रसिध कृष्णाने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्याने ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर चेंडू टाकला आणि त्यात विराट अडकला. त्यामुळे अवघ्या ७ धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. विराटची विकेट, पाहा व्हिडीओ-

विराटची यंदाच्या हंगामातील कामगिरी

विराटसाठी हा हंगाम अतिशय वाईट ठरला. विराट खराब फॉर्ममध्ये असूनही त्याला संघाबाहेर करण्यात आले नाही. त्याने साखळी फेरीचे सर्व सामने खेळले. तसेच, एलिमिनेटर सामनाही खेळला. पण आजचा सामना पकडून एकूण १६ सामने खेळल्यानंतरही विराटला ३५०चा टप्पाही ओलांडता आला नाही. त्याने दोन अर्धशतकांच्या बळावर २२च्या सरासरीने केवळ ३४१ धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App