Virat Kohli On Bengaluru Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने आयपीएल २०२५ च्या हंगामात १७ वर्षांचा दुष्काल संपवत पहिली वहिली IPL ट्रॉफी जिंकली. या आनंद काही तासांत शोककळा पसरवणारा ठरेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. चॅम्पियन्स झाल्याचा आनंदोत्सव दु:खात बदलला. रक्तात RBC (रक्तातील लालपेशी) नव्हे (RCB) चं काउंट आहे, अशा उत्साहाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला पाठिंबा दर्शवणाऱ्या चाहत्यांचे रक्त सांडले. ४ जूनला बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB नं मिळवलेल्या जेतेपदाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मोठी गर्दी जमली अन् चेंगराचेंगरीच्या दुर्घटने ११ RCB चाहत्यांनी आपला जीव गमावला. जवळपास तीन महिन्यानंतर विराट कोहलीनं यावर भाष्य केले आहे. रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझीनं किंग कोहलीची भावना व्यक्त करणारी एक पोस्ट आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय म्हणाला कोहली?
कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात ज्यासाठी आपण अजिबात तयार नसतो. ४ जून हा असाच एक दिवस होता. हा दिवस फ्रँचायझीसाठी सर्वात आनंददायी असायला हवा होता. पण तो क्षण दु:खात बदलला. दुर्देवी घटनेत जीव गमावलेल्या चाहत्यांच्या कुटुंबियासह यात जखमी झालेल्यासाठी मी प्रार्थना करतो. तुमचं दु:ख हे आमच्या आयुष्यातील चॅप्टरचा एक भागच आहे. आता आपण सर्वांनी मिळून अधिक संवेदनशील अन् जबाबदारीसह पुढे जायला हवे . अशा आशयाच्या शब्दांत विराट कोहलीनं बंगळुरु येथील चेंगराचेंगरी प्रकरणातील दुर्घटनेसंदर्भात आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे.
RCB कडून बंगळुरु चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत
याआधी RCB नं भावनिक पोस्ट शेअर करत मृतांच्या कुटुंबींयाना दिली होती आर्थिक मदत
याआधी आरसीबीच्या संघाने काही दिवसांपूर्वीच ‘RCB Cares’ च्या माध्यमातून या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५-२५ लाख रुपयांची मदत दिली होती. या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेयियमवर बंदीही घालण्यात आली आहे. आगामी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील या मैदानात रंगणारे सामने मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर स्थलांतरित करण्यात आले आहेत.