Join us

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा लूक होतोय व्हायरल, १० दिवसांच्या सुट्टीत माजी कर्णधार काय करतोय?

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांपूर्वी बायो बबल सोडले आणि सुट्टीवर गेला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 17:30 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांपूर्वी बायो बबल सोडले आणि सुट्टीवर गेला. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. ३३ वर्षीय विराटचा नवा लूक सोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झाला, त्यात विराट पंजाबी लूकमध्ये दिसत आहे. सोबत पत्नी अनुष्का शर्माही आहे, विराट व अनुष्का यांची लवकरच नवीन जाहीरात येणार आहे आणि त्याच्याच चित्रिकरणासाठी विराटने हा लूक घेतला आहे. 

Paparazziने काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. २०१३मध्ये एका जाहीरातीत विराट-अनुष्का यांची पहिली भेट झाली होती आणि २०१७मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्न केले. मागच्या वर्षी त्यांच्या घरी एक नन्ही परी आली आणि तिचं नाव वामिका असे ठेवण्यात आले आहे. विराटने ट्वेंटी-२० मालिकेतून सुट्टी घेतली असली तरी तो दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बायो बबलमध्ये दाखल होणार आहे.  मोहाली आणि बंगळुरू येथे हे दोन सामने होतील आणि विराट त्याचा १००वा कसोटी सामना मोहालीत खेळणार आहे.

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने ट्विटरवरुन चाहत्यांना एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये एक फोटो शेअर करत विराटने चाहत्याने चॅलेंज केले होते. एकाच कपड्यात असलेले विराट कोहलीचे 10 छायाचित्र विराटने शेअर केले होते. चाय पे चर्चा करतानाचे हे 10 जण वेगवेगळ्या पोझमध्ये दिसून येत आहेत. एकच सुट, दाढीचा सेम कोरीव आकार आणि स्टाईलमुळे हे सर्वच सेम टू सेम दिसून येतात. त्यात एक फोटो वेगळा असून तोच फोटो ओळखण्याचे काम विराटने चाहत्यांना दिले होते. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा
Open in App