Join us

VIDEO: अनुष्काच्या वाढदिवसासाठी विराटने अशी केली होती फुलांची सजावट

अनुष्काचा वाढदिवस परफेक्ट साजरा व्हावा यासाठी कॅप्टन कोहलीनेही बरिच मेहनत केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 12:34 IST

Open in App

बंगळुरू- 1 मे रोजी अभिनेत्री अनुष्का शर्माने 30 वा वाढदिवस साजरा केला. विराट कोहलीबरोबर अनुष्काने बंगळुरुमध्ये वाढदिवस साजरा केला. त्याच दिवशी आरसीबीची मॅच असल्याने अनुष्का मॅच पाहतानाही स्टेडिअममध्ये दिसली होती. अनुष्काचा वाढदिवस परफेक्ट साजरा व्हावा यासाठी कॅप्टन कोहलीनेही बरिच मेहनत केली. विराटने गुलाबी व लाल रंगाच्या फुलांनी अनुष्काची खोली सजवली होती. तसंच विविध रंगांच्या मेणबत्तीचंही डेकोरेशन करण्यात आलं. सजावटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

 

अनुष्का शर्माच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर फुलांच्या सजावटीचे फोटो शेअर केले आहेत. अनुष्काची संपूर्ण खोली रंगीत फुलांनी सजवली असल्याचं फोटोमध्ये दिसतं आहे. पत्नी अनुष्काला खुश करण्यासाठी विराटचा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडतो आहे. अनुष्काचा यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी फारच खास होता. 1 मे रोजी अनुष्काने अॅनिमल शेल्टरची घोषणा केली. त्याच दिवशी विराटने मॅचही जिंकली. मॅच जिंकून विराटने अनुष्काला वाढदिवसाची भेट दिली. हे दोघे मुव्ही डेटवरही गेले होते. 

 

टॅग्स :विरूष्काविराट कोहलीअनुष्का शर्मा