VIDEO: अनुष्काच्या वाढदिवसासाठी विराटने अशी केली होती फुलांची सजावट

अनुष्काचा वाढदिवस परफेक्ट साजरा व्हावा यासाठी कॅप्टन कोहलीनेही बरिच मेहनत केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 12:34 IST2018-05-03T12:34:07+5:302018-05-03T12:34:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
virat kohli decorated room with vibrant flowers for anushka sharma birthday video viral | VIDEO: अनुष्काच्या वाढदिवसासाठी विराटने अशी केली होती फुलांची सजावट

VIDEO: अनुष्काच्या वाढदिवसासाठी विराटने अशी केली होती फुलांची सजावट

बंगळुरू- 1 मे रोजी अभिनेत्री अनुष्का शर्माने 30 वा वाढदिवस साजरा केला. विराट कोहलीबरोबर अनुष्काने बंगळुरुमध्ये वाढदिवस साजरा केला. त्याच दिवशी आरसीबीची मॅच असल्याने अनुष्का मॅच पाहतानाही स्टेडिअममध्ये दिसली होती. अनुष्काचा वाढदिवस परफेक्ट साजरा व्हावा यासाठी कॅप्टन कोहलीनेही बरिच मेहनत केली. विराटने गुलाबी व लाल रंगाच्या फुलांनी अनुष्काची खोली सजवली होती. तसंच विविध रंगांच्या मेणबत्तीचंही डेकोरेशन करण्यात आलं. सजावटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 



 

अनुष्का शर्माच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर फुलांच्या सजावटीचे फोटो शेअर केले आहेत. अनुष्काची संपूर्ण खोली रंगीत फुलांनी सजवली असल्याचं फोटोमध्ये दिसतं आहे. पत्नी अनुष्काला खुश करण्यासाठी विराटचा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडतो आहे. 
अनुष्काचा यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी फारच खास होता. 1 मे रोजी अनुष्काने अॅनिमल शेल्टरची घोषणा केली. त्याच दिवशी विराटने मॅचही जिंकली. मॅच जिंकून विराटने अनुष्काला वाढदिवसाची भेट दिली. हे दोघे मुव्ही डेटवरही गेले होते. 



 

Web Title: virat kohli decorated room with vibrant flowers for anushka sharma birthday video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.